Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन*

*
पुणे, दि. ७ (जिमाका, वृत्तसेवा) : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्याय भवन येथे ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून, त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहानिमित्त संविधानाविषयी जनजागृती, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, ग्रामीण शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे प्रबोधन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे तसेच शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांनी केले आहे.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments