Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized‘अल्केम’कडून प्रौढांसाठी मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट दाखल

‘अल्केम’कडून प्रौढांसाठी मल्टिव्हिटॅमिन सप्लिमेंट दाखल

पुणे, एप्रिल ८, २०२६: अल्‍केम लॅबोरेटरीजने आज प्रौढांकरिता शरीर आणि मनाला सर्वांगीण पोषण देण्यासाठी दररोज घेता येणारे मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट‘ए टू झेड डेली’च्‍या लाँचची घोषणा केली.
ए टू झेड डेली’टॅब्लेट्स संतुलित पोषण देण्यासाठी एकूण २६ अत्यावश्यक व्हिटॅमिन्‍स, खनिजे आणि वनस्पती अर्कांसह तयार करण्यात आल्या आहेत. यातील मुख्य व्हिटॅमिन्‍स आणि मिनरल्‍समध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन डी३, व्हिटॅमिन सी, झिंक आणि लोह यांचा समावेश आहे. यामुळे ऊर्जेची पातळी वाढवण्यास, थकवा कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्‍यास मदत करतात. तसेच, या उत्पादनात अश्वगंधा, ब्राह्मी, पॅनॅक्स जिनसेंग आणि अमिनो अॅसिड एल-थिनिन यांसारख्या वैद्यकीयदृष्‍ट्या संशोधित वनौषधींचा समावेश आहे. हे घटक मानसिक ताण आणि चिंता व्यवस्थापित करण्यास, झोपेची गुणवत्ता सुधारण्यास आणि संज्ञानात्मक कार्यास मदत करतात, असे अल्‍केमचे चीफ एक्झिक्‍युटिव्‍ह ऑफिसर डॉ. विकास गुप्‍ता यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, फक्त पोषणाची कमतरता भरून काढणाऱ्या पारंपारिक मल्टीव्हिटॅमिन्सच्या तुलनेत ‘ए टू झेड डेली’ व्‍यक्तींची शारीरिक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि दैनंदिन ताणतणाव व कामाच्या व्यापात मानसिक संतुलन राखण्यासाठी दैनंदिन सहाय्यक सप्लिमेंट म्हणून डिझाइन करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य दृष्टिकोनाचा भाग म्हणून हे उत्पादन दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण वापरासाठी तयार करण्यात आले आहे.
“आपली सध्याची जीवनशैली केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक आरोग्यावरही सतत ताण टाकत आहे. व्‍यक्तींना वाढता ताण, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर अनुभव येत आहे. विचारपूर्वक तयार केलेले न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. A to Z Daily शरीर आणि मन या दोन्हीला संतुलित व दैनंदिन आधार देण्यासाठी आवश्यक घटकांना एकत्र आणते. हे उत्पादन केवळ तात्पुरता उपाय म्हणून नाही, तर दैनंदिन ताणतणाव व्यवस्थापित करताना संपूर्ण चैतन्य सुधारू इच्छिणाऱ्या व्‍यक्तींसाठी सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन दृष्टिकोन म्हणून सादर करण्यात आले आहे.”
A to Z Daily मध्ये १९ आवश्यक व्हिटॅमिन्‍स आणि खनिजांचे दररोज आवश्यक असलेले पूर्ण प्रमाण समाविष्ट आहे. हे आहारातील सामान्य त्रुटी भरून काढण्यास आणि प्रौढांमधील एकूण पौष्टिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते. हे उत्पादन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय)द्वारे मान्यताप्राप्त आहे. तसेच, हे १०० टक्‍के शाकाहारी उत्पादन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments