Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized३० व्या गांधी दर्शन शिबिरात महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्याने

३० व्या गांधी दर्शन शिबिरात महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर व्याख्याने

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर विशेष व्याख्याने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे रविवार दि. १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. गांधी विचार दर्शन मालिकेतेतील या ३०व्या पुष्पात सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ३ विशेष व्याख्याने होणार आहेत. ही व्याख्याने सर्वांसाठी खुली आहेत.

रविवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भूमी अधिकार’ या विषयावर युवा भारत आंदोलनचे सल्लागार शशी सोनावणे यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर ‘महात्मा फुले यांच्या कार्याची सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी’ या विषयावर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विश्वनाथ शिंदे यांचे व्याख्यान होईल.

भोजनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक दृष्टीकोन’ या विषयावर मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य आणि निवृत्त प्राध्यापक प्रा. पी. विठ्ठल यांच्या व्याख्यानाने ३०व्या गांधी विचार दर्शन शिबिराचा समारोप होईल. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी याचे आयोजन केले आहे अशी माहिती महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली.

यासाठी संपर्क – सुरज कुलकर्णी – 93268 82000, युक्रांदचे पुणे शहर संघटक तेजस भालेराव – 91724 87019 आणि गांधी दर्शन शिबिराचे समन्वयक गणेश गाढवे – 96579 49574 यांच्याशी संपर्क करावा असे संयोजकानी कळवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments