Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रपत्र सादर करण्याचे उद्योगांना आवाहन*

*स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रपत्र सादर करण्याचे उद्योगांना आवाहन*

पुणे, दि. १० (जिमाका, वृत्तसेवा): औद्योगिक विकासाच्या लाभामध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा, या उद्देशाने राज्यातील औद्योगिक उपक्रमांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्याने रोजगार देण्याचे धोरण राज्यशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सर्व औद्योगिक उपक्रमांनी त्यांच्या संस्थेमधील पर्यवेक्षकीय व इतर कामगारांची माहिती ‘स्थानिक लोकांना रोजगार प्रपत्र-१’ मध्ये भरून ३० जूनपूर्वी जिल्हा उद्योग केंद्र पुणे येथे सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या धोरणानुसार औद्योगिक उपक्रमांनी पर्यवेक्षकीय श्रेणीमध्ये किमान ५० टक्के व पर्यवेक्षकीय सहीत इतर श्रेणींमध्ये किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच, नोकर भरती करणारा अधिकारी मराठी भाषा जाणणारा असणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने सर्व औद्योगिक उपक्रमांनी ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अद्ययावत माहितीचे ‘स्थानिक लोकांना रोजगार प्रपत्र-१’ ३० जून २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती अर्चना कोठारी यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments