Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा*

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा*

*

पुणे, दि. १० (जिमाका, वृत्तसेवा): १३२ इन्फंट्री बटालियन टीए (इको) राजपूत मध्ये माजी सैनिक तसेच (एमओईएफ व सीसी) आणि महाराष्ट्र राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी (अकाली निवृत्तीसह) भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा २० एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे होणार असून भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांनी २० एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसह शारीरिक तंदुरुस्ती चाचणीसाठी उपस्थित राहावे.

भरतीसाठी रिक्त पदे जेसीओ-2, सोल्जर जीडी २२, लिपिक-१, सोल्जर चिफ-१, सोल्जर स्टेवार्ड १ असून याकरिता माजी सैनिकांसाठी किमान वयोमर्यादा नाही, मात्र सेवानिवृत्ती/डिस्चार्ज झाल्यापासून ५ वर्षांच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील, माजी महिला कर्मचाऱ्यांसाठीही समान अट लागू राहील, अशा पात्रता व अटी शर्ती आहेत. माजी सैनिक यांना ५० वर्षे व माजी सैनिक यांना ५५ वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे निवृत्तीवेतन आदेश, डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचे ८ रंगीत फोटो, शैक्षणिक व जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल सतीश दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments