Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरा. स्व. संघ स्वयंसेवकांच्या वतीने महात्मा फुलेंना अभिवादन

रा. स्व. संघ स्वयंसेवकांच्या वतीने महात्मा फुलेंना अभिवादन

पुणे, दिनांक ११ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त शनिवारी पुणे शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सामाजिक समरसता गतीविधीच्या वतीने गंज पेठेतील ‘महात्मा फुले वाडा’ येथे मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.

गंज पेठेतील अभिवादनाप्रसंगी दलितमित्र पुरस्कारप्राप्त धोंडीराम कारंडे, महात्मा फुले नगराचे संघचालक मकरंद ढवळे, राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले विचार साधन समिती’च्या सदस्या शामाताई घोणसे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख सुनील भंडगे, शरद शिंदे आदी उपस्थित होते.

– विद्यापीठ भागात ‘अखंडा’चे वाचन
सामाजिक समरसता मंच (विद्यापीठ भाग) यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील महात्मा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महात्मा फुले लिखित ‘अखंडा’चे सामूहिक वाचन करण्यात आले, जे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

या प्रसंगी विद्यापीठ नगर तरुण व्यवसाय प्रमुख दिनकर पतंगे, सेवा प्रमुख संजय मोरे, एकत्व प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमरजित सोनवणे, पुणे महानगर सद्भावना संयोजक संजय एडगे उपस्थित होते. तसेच प्रतीक गायकवाड, संजय गायकवाड, रोहित पाटील, ऋषिकेश जाधव, डॉ. अमोल तांबे आदी कार्यकर्त्यांनीही या अभिवादन सोहळ्यात सहभाग नोंदवला. शहराच्या इतर उपनगरांमध्येही समरसता गतीविधीच्या वतीने छोटेखानी कार्यक्रमांद्वारे महात्मा फुलेंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

– पिंपरी-चिंचवडमध्ये अभिवादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा आणि समरसता गतीविधी यांच्या वतीने पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन स्मारकस्थानी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे, सांगवी गट संघचालक लक्ष्मणजी पवार, मातंग साहित्य परिषदेचे डॉ. धनंजयजी भिसे, धनंजयजी खुडे, संत तुकाराम नगर कार्यवाह आणि संघाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments