Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorized१०वी-१२वी नंतर विद्यार्थ्यांना ‘उड्डाण’ची संधी : १५ दिवसीय उद्योजकता उपक्रम ...

१०वी-१२वी नंतर विद्यार्थ्यांना ‘उड्डाण’ची संधी : १५ दिवसीय उद्योजकता उपक्रम · उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिपतर्फे ‘उड्डाण व्हेंचर लॉन्चपॅड’ची घोषणा

पुणे, १३ एप्रिल २०२६ : नुकतीच इयत्ता १०वी आणि १२वी प्रतीक्षा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी “द उदयन स्कूल ऑफ सोशल लीडरशिप (USSL)” तर्फे त्यांच्या प्रमुख ‘उड्डाण व्हेंचर लॉन्चपॅड’ हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे, हा १५ दिवसांचा सघन उद्योजकता उपक्रम १५ एप्रिल २०२६ पासून सुरू होणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश केवळ पुस्तकांपुरते शिक्षण मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा उपयोग करता यावा हा आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यवसाय कल्पना उभारून त्यावर काम करण्याची आणि त्या प्रत्यक्षात कितपत यशस्वी ठरू शकतात याची चाचणी घेण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.

या कार्यशाळेबाबत बोलताना द वंडर स्कूल, पुणे च्या संचालिका अनामिका दासगुप्ता म्हणाल्या, “आमच्या मते शिक्षण हे फक्त वर्गखोल्या आणि गुणांपुरते मर्यादित नसून, ते आयुष्याशी जोडलेले असावे. ‘उड्डाण व्हेंचर लॉन्चपॅड’ हा तरुणांना केवळ शिकवण्याचा नाही, तर त्यांना विचार करायला, प्रयोग करायला आणि स्वतः काहीतरी घडवून आणायला प्रवृत्त करणारा उपक्रम आहे. या १५ दिवसांत विद्यार्थी व्यवसाय कसा करावा हे समजून घेतीलच पण स्वतःच्या कल्पना उभारून त्या प्रत्यक्षात आणण्याचाही अनुभव घेतील.”

तसेच त्या पुढे म्हणाल्या, “हा उपक्रम विद्यार्थ्यांना लवकरच जोखीम घेणे, नवीन कल्पना मांडणे आणि नेतृत्व करणे याचा अनुभव देईल आणि त्यामुळे ते उद्याच्या संधींची वाट पाहत बसत नाहीत, तर आजच त्या निर्माण करण्याचा आत्मविश्वास मिळवतील.”

पारंपरिक कार्यशाळांपेक्षा ‘उड्डाण’ हा अधिक अनुभवाधारित आणि सहभागी उपक्रम असून, यात विद्यार्थी प्रत्यक्ष काम करत शिकणार आहेत.

या कार्यशाळेतील प्रमुख मुद्दे

· प्रत्यक्ष व्यवसाय कल्पना सुचवणे आणि त्यांची पडताळणी करणे

· निधी उभारणी (फंडरेझिंग) आणि प्रभावी सादरीकरण (पिचिंग) करण्याची मूलभूत तत्त्वे शिकणे

· प्रत्यक्ष आव्हानांमधून व्यवसाय उभारणे आणि सुरू करण्याचा अनुभव घेणे

· स्पर्धेत सहभागी होत मानांकन आणि आकर्षक पारितोषिकांची संधी मिळवणे

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘लर्न बाय डुईंग’ (Learn by Doing) ही पद्धत असणार आहे. येथे विद्यार्थ्यांना केवळ उद्योजकतेचे धडे दिले जाणार नाहीत, तर अल्प कालावधीत स्वतः काहीतरी उभे करण्याचा आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम पाहण्याचा अनुभव दिला जाणार आहे.

हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला असून, कोणत्याही पार्श्वभूमीतील उत्साही विद्यार्थ्यांना सहभागी होऊ शकतो आणि यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. केवळ १५ विद्यार्थ्यांचा मर्यादित गट असल्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन, एकाग्र शिक्षण आणि प्रभावी परिणाम मिळतील याची खात्री दिली जाईल.

हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात येणार असून, नवकल्पना, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी प्रेरणादायी व सहकार्यपूर्ण वातावरण येथे निर्माण केले जाणार आहे.

पात्रता: नुकतीच इयत्ता १०वी किंवा १२वी पूर्ण केलेले विद्यार्थी (शैक्षणिक गुणांची अट नाही)

कार्यक्रम तपशील:

कालावधी : १५ दिवस (१५ ते २९ एप्रिल २०२६)

स्थळ : पुणे

शुल्क : विनामूल्य

अर्ज करण्याची पद्धत:

इच्छुक विद्यार्थ्यांनी “UDAAN” असा संदेश व्हॉट्सॲप (WhatsApp) वर +९१ ८९९९० ८९८४९ या क्रमांकावर पाठवून नोंदणी करू शकता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments