Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेरोसीन वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर*

केरोसीन वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर*

*

पुणे, दि. १३ (जिमाका, वृत्तसेवा): माहे मार्च २०२६ कालावधीसाठी केरोसीन (रॉकेल) वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. अंत्योदय
व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना प्राधान्य देण्यात येणार असून, उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकाधारक, शिधापत्रिका नसलेले कुटुंब (ग्रामपंचायत दाखल्यासह) तसेच स्थलांतरित मजूर यांनाही वितरण केले जाईल.

केरोसीनचा संपूर्ण कोटा वाटप दिनांकापासून ४५ दिवसांत उचलणे बंधनकारक असून, उर्वरित साठा पुढे नेण्यात येणार नाही.
वितरण प्रक्रिया तेल कंपन्यांचे वितरक, किरकोळ परवानाधारक/रास्तभाव दुकानदार, लाभार्थी अशा टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास ३ लिटर प्रमाणे वाटप करणे आवश्यक असून, दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले राहतील.

तेल कंपन्यांनी पुरवठा नियमित ठेवावा, तसेच ८५% केरोसीन पहिल्या पंधरवड्यात उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावर तहसीलदारांच्या देखरेखीखाली वितरण होणार असून, गैरवापर टाळण्यासाठी संयुक्त तपासणी पथक (तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पोलीस) नियुक्त करण्यात येणार आहे. केरोसीनचा वापर फक्त घरगुती कारणासाठीच करता येणार असून, भेसळ किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.

तरी सर्व संबंधितांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments