Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअॅक्सिस म्युच्युअल फंडकडून अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड सादर

अॅक्सिस म्युच्युअल फंडकडून अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड सादर

हा निफ्टी इंडिया डिफेन्स टीआरआयचा मागोवा घेणारा ओपन-एंडेड इंडेक्स फंड आहे)
या फंडाचे भारतातील संरक्षण क्षेत्रातील संरचनात्मक वाढीच्या संधींचा लाभ घेण्‍याचे उद्दिष्ट आहे.

मुंबई, ९ एप्रिल २०२६: अॅक्सिस म्युच्युअल फंड या भारतातील आघाडीच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने आपली नवीन फंड ऑफरिंग अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड लाँच केला आहे. हा ओपन-एंडेड इंडेक्स फंड असून निफ्टी इंडिया डिफेन्स टीआरआयमधील समाविष्ट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. हा एनएफओ गुंतवणुकीसाठी १० एप्रिल २०२६ पासून खुला होईल आणि २४ एप्रिल २०२६ रोजी बंद होईल. अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडाचे निफ्टी इंडिया डिफेन्स टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय)च्या कामगिरीशी जुळणारा परतावा खर्च वजा जाता आणि ट्रॅकिंग एररच्या अधीन राहून देण्‍याचे उद्दिष्ट आहे. वाढता जागतिक संरक्षण खर्च, भारताचे वेगवान संरक्षण आधुनिकीकरण आणि स्वदेशी उत्पादन व निर्यातीसाठी सरकारचा असलेला खंबीर पाठिंबा यांमुळे निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन संरचनात्मक संधींमध्ये सहभागी होण्यासाठी हा फंड गुंतवणूकदारांना कमी खर्चाचा, पद्धतशीर आणि पारदर्शक पर्याय उपलब्ध करून देतो.
संरक्षण क्षेत्रच का?
जागतिक स्तरावर वाढता भू-राजकीय तणाव, प्रादेशिक संघर्ष आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेकडे होत असलेले संक्रमण यांमुळे संरक्षण खर्चात सातत्याने वाढ होत आहे. २०२४ मध्ये हा खर्च २.७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. या संरचनात्मक बदलामुळे विकसित आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये लष्करी क्षमता वाढवण्यासाठी मोठी व शाश्वत गुंतवणूक केली जात आहे. भारत देखील या प्रवाहात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संरक्षण क्षमतांच्या आधुनिकीकरणासाठी वाढलेली अर्थसंकल्पीय तरतूद, खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देणारे धोरणात्मक बदल, वाढवलेली परदेशी गुंतवणूक मर्यादा आणि संरक्षण निर्यात वाढवण्यासाठी दिलेला विशेष भर यांमुळे भारतातील संरक्षण क्षेत्र वेगाने प्रगत होत आहे.
भारताच्या संरक्षण अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष २०१४ पासून जवळपास २.७ पटीने वाढ झाली आहे, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये साधारण ६.८ लाख कोटी रूपयांवर पोहोचला आहे. यामधून संरक्षण क्षमता मजबूत करण्याबाबत सरकारची दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते. तसेच, गेल्या पाच वर्षांत देशांतर्गत संरक्षण उत्पादनात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे, जे २०२९ पर्यंत पुन्हा दुप्पट करण्याचे अधिकृत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारताची संरक्षण निर्यात देखील झपाट्याने वाढली आहे. आर्थिक वर्ष २०१७ मध्ये ही निर्यात २,००० कोटी रूपयांपेक्षा कमी होती, जी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ३,००० कोटी रूपयांच्या पुढे गेली आहे. यामधून भारतातील संरक्षण प्लॅटफॉर्म्स आणि यंत्रणांना जागतिक स्तरावर मिळणारी वाढती पसंती दिसून येते.
अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंड
अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडचा मूळ निर्देशांकाला सादर करत निवडक कंपन्यांचा मागोवा घेण्याचा मनसुबा आहे, ज्यांचा महसुलाचा मोठा हिस्सा संरक्षण-संबंधित क्रियाकलापांतून येतो. या निर्देशांकात एरोस्पेस व संरक्षण उपकरणे, जहाजबांधणी, स्फोटके आणि संबंधित सेवांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची निवड ठराविक पात्रता निकषांद्वारे केली जाते आणि फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशननुसार योग्य मर्यादेसह प्राधान्‍य दिले जाते. या निर्देशांकाचे दर सहा महिन्यांनी पुनर्संतुलन केले जाते, ज्यामुळे शिस्त आणि पारदर्शकता सुनिश्चित होते.
या लाँचबाबत मत व्‍यक्त करत अॅक्सिस एएमसीचे एमडी आणि सीईओ बी. गोपकुमार म्हणाले, “भारतातील संरक्षण क्षेत्र सध्या बहु-वर्षीय स्थित्यंतरातून जात आहे, ज्याला वाढते बजेट, खंबीर धोरणात्मक हेतू आणि विस्तारीत निर्यात संधींचा पाठिंबा आहे. अॅक्सिस निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स फंडच्या माध्यमातून आम्ही गुंतवणूकदारांना या संरचनात्मक वाढीच्या थीममध्ये सहभागी होण्यासाठी कमी खर्चाचा आणि नियमांवर आधारित पर्याय उपलब्ध करून देत आहोत. हा फंड गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात आणि आपल्या पोर्टफोलिओला भारताच्या धोरणात्मक व उत्पादन क्षेत्रातील प्राधान्यांशी जोडू इच्छितात.”
या फंडाची प्रमुख वैशिष्ट्ये:
भारतातील संरक्षण क्षेत्र सध्या संरचनात्मक तेजीच्या टप्प्यातून जात आहे. याला वाढता देशांतर्गत संरक्षण खर्च, आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत मिळणारा प्रबळ धोरणात्मक पाठिंबा आणि कमी बेसवरून झपाट्याने वाढणारी संरक्षण निर्यात यांमुळे गती मिळत आहे. जगभरात निर्माण होत असलेल्या बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेमुळे संरक्षण खर्चात सातत्यपूर्ण वाढ होत आहे. अलीकडच्या काळात बाजारपेठेमध्ये झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे कंपन्यांचे मूल्‍यांकन अधिक आकर्षक झाले आहे. भारतातील संरक्षण कंपन्यांसाठी यातून दीर्घकालीन संधी निर्माण होत आहेत.

या फंडाचे व्यवस्थापन नंदीक मल्लिक आणि रोहित गौतम यांच्याद्वारे केले जाईल. हा फंड पॅसिव्ह गुंतवणूक पद्धतीचा अवलंब करतो, ज्यामुळे फंड मॅनेजरचा वैयक्तिक पूर्वग्रह दूर होतो आणि आघाडीच्या संरक्षण-केंद्रित कंपन्यांमध्ये वैविध्यपूर्ण गुंतवणूक मिळते. ही विशिष्ट क्षेत्रावर आधारित गुंतवणूक असल्याने गुंतवणूकदारांनी अल्प ते मध्यम कालावधीत अधिक चढ-उतारांची अपेक्षा ठेवावी. त्यामुळे, या फंडात दीर्घकालीन दृष्टिकोनातून आणि शक्यतो सिस्‍टेमॅटिक इन्‍व्‍हेस्‍टमेंट प्‍लॅन्‍स (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.
***********

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments