Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात १७ एप्रिलला 'राष्ट्रभक्तीचा चिरंतन प्रवाह' सांगितिक सोहळा* *भैय्याजी जोशी, शांताक्का यांची...

पुण्यात १७ एप्रिलला ‘राष्ट्रभक्तीचा चिरंतन प्रवाह’ सांगितिक सोहळा* *भैय्याजी जोशी, शांताक्का यांची प्रमुख उपस्थिती*

*

पुणे:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आणि राष्ट्र सेविका समितीच्या ९० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून ‘आकार पुणे’ संस्थेच्या वतीने ‘राष्ट्रभक्ती का चिरंतन प्रवाह’ या सांगितिक अविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी १७ एप्रिलला सायंकाळी ६:३० वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश तथा भैय्याजी जोशी आणि राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांता कुमारी (शांताक्का) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन प्रमुख संघटनांच्या समांतर प्रवासाला समर्पित आहे. ‘आकार पुणे’ संस्थेने या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण सांगितिक रचना पुणेकरांसमोर सादर करण्याचे ठरवले असून, यात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. संकल्पना चित्रा देशपांडे, सुखदा खांडकेकर आणि श्रीकांत कोठे यांची आहे. तर संहिता लेखन आणि निवेदन सुप्रिया गोडबोले यांचे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षे आणि समितीची ९० वर्षे हा टप्पा सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि देशभक्तीपर गीतांचा हा सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments