बेंगळुरू, १४ एप्रिल २०२६: सोन्याचे भाव आता तुमच्या खरेदीच्या आड येणार नाहीत! यंदाच्या अक्षय तृतीयेला ज्वेलर्स तुमचे खरेदीचे नियोजन अधिक स्मार्ट आणि सोपे करत आहेत. भारतातील आघाडीचा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्ट आणि कल्याण ज्वेलर्स यांनी एकत्र येत ‘गोल्ड रेट प्रोटेक्शन’ ही विशेष सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे तुम्ही सोन्याचा आजचा दर लॉक करू शकता. सर्वात मोठा फायदा म्हणजे, अक्षय तृतीयेला सोने खरेदी करताना आजचा लॉक केलेला दर किंवा त्या दिवसाचा बाजारभाव, यापैकी जो दर कमी असेल त्याच दरात तुम्हाला सोने मिळेल.
अक्षय तृतीया म्हणजे सुख-समृद्धीचे प्रतीक आणि नव्या कार्याचा शुभारंभ! सणासुदीच्या या धावपळीत तुमची खरेदी सुखकर व्हावी, यासाठी इन्स्टामार्ट घेऊन आले आहे ‘गोल्ड रेट प्रोटेक्शन’ सुविधा. आता कल्याण ज्वेलर्सची बीआयएस (BIS) हॉलमार्क असलेली सोन्याची नाणी मिळवा पूर्ण खात्रीसह आणि विश्वासाने, तेही घरबसल्या एका क्लिकवर!
तुमचे सोने बुक करण्याची सोपी पद्धत:
१० ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान, ग्राहक इन्स्टामार्ट ॲपवर कल्याण ज्वेलर्सची सोन्याची नाणी निवडू शकतात आणि केवळ ५% आगाऊ रक्कम (ऍडव्हान्स) देऊन ती प्री-बुक करू शकतात. ०.५ ग्रॅम सोन्याच्या नाण्यासाठी ही प्री-बुकिंग अवघ्या ₹५०० पासून सुरू होते. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला याची डिलिव्हरी मिळेल. १९ एप्रिलला (अक्षय तृतीया) सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० या वेळेत तुम्ही तुमची खरेदी पूर्ण करू शकता. या ऑफरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे—तुम्हाला तीच किंमत द्यावी लागेल जी कमी असेल; मग तो प्री-बुकिंगच्या दिवसाचा दर असो किंवा डिलिव्हरीच्या दिवसाचा बाजारभाव! इतकेच नाही तर, प्री-बुक करणाऱ्या सर्व ग्राहकांना कल्याण ज्वेलर्सतर्फे एक चांदीचे नाणे मोफत दिले जाईल.
इन्स्टामार्टचे व्हीपी ग्रोथ अर्जुन चौधरी म्हणाले: “इन्स्टामार्टवर आमचा नेहमीच असा प्रयत्न राहिला आहे की, सणासुदीच्या काळात भारतीयांच्या मौल्यवान खरेदीत आम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण बदल घडवून आणावा—मग ते धनत्रयोदशीला १ किलो चांदीच्या विटांची डिलिव्हरी असो किंवा रक्षाबंधनासाठी चांदीच्या राख्या प्रस्तुत करणे असो. ‘गोल्ड रेट प्रोटेक्शन’ ही सुविधा सणांच्या काळात ग्राहकांचा खरेदीतील आत्मविश्वास वाढवण्यासाठीच तयार केली आहे. ग्राहकांना सोन्याचे दर आधीच लॉक करण्याची संधी देऊन आणि किमती कमी झाल्यास त्याचाही फायदा मिळवून देऊन, आम्ही त्यांना सर्वोत्तम ‘व्हॅल्यू’ देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे केवळ सोयीसाठी नसून सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या खरेदीला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवणारे ‘क्विक कॉमर्स’चे पाऊल आहे.”
कल्याण ज्वेलर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रमेश कल्याणरमन म्हणाले: “कल्याण ज्वेलर्सच्या शोरूम्समध्ये ‘गोल्ड रेट प्रोटेक्शन’ ही ग्राहकांची नेहमीच पसंतीची सुविधा राहिली आहे, कारण यामुळे त्यांना सणासुदीच्या खरेदी अधिक खात्रीने आणि विश्वासाने करता येते. इन्स्टामार्टच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदाच ही सुविधा ‘क्विक कॉमर्स’ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देत आहोत. काळानुसार परंपरा बदलत असल्या तरी, सोन्याची खरेदी ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि संस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला इन्स्टामार्टवरील सोने आणि चांदीच्या नाण्यांच्या विक्रीत धनत्रयोदशीच्या तुलनेत ५००% पेक्षा जास्त वाढ झाली. यावरून शुभ मुहूर्तावर करावयाची खरेदी करण्यासाठी भारतीय ग्राहक आता ‘क्विक कॉमर्स’ या माध्यमावर अधिक विश्वास दाखवत असल्याचे स्पष्ट होते.
दैनंदिन गरजांच्या पलीकडे जाऊन, सण आणि विशेष प्रसंगांच्या खरेदीसाठी एक विश्वासार्ह डेस्टिनेशन म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या इन्स्टामार्टच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधील हा एक नवीन उपक्रम आहे. एक असे डेस्टिनेशन, जिथे ग्राहकांना त्याच वेगाने आणि विश्वासाने सेवा मिळते, ज्याचा अनुभव त्यांना आजवर आला आहे.
सोन्याची सर्व नाणी आणि मोफत मिळणारी चांदीची नाणी* BIS हॉलमार्क प्रमाणित आणि २४ कॅरेट शुद्धतेची आहेत. कल्याण ज्वेलर्सची ही नाणी उपलब्धतेनुसार* आणि ऑफरच्या नियम व अटींच्या अधीन असतील.
*नियम व अटी लागू आहेत.
‘गोल्ड प्राईस लॉक’ ही इन्स्टामार्टवर उपलब्ध असलेल्या कल्याण ज्वेलर्सच्या निवडक उत्पादनांवर, विक्रेत्याकडून मर्यादित कालावधीसाठी दिली जाणारी ऑफर आहे. यासाठी ‘प्राईस-लॉक’ शुल्क भरणे आवश्यक आहे, जे १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० दरम्यान केल्या जाणाऱ्या अंतिम खरेदीच्या वेळी ऍडजस्ट केले जाईल. खरेदीची अंतिम किंमत ही लॉक केलेला दर किंवा त्या दिवसाचा बाजारभाव, यापैकी जी कमी असेल तीच ग्राहकाला लागू होईल. मोफत चांदीच्या नाण्यासह ही ऑफर उपलब्धतेवर आधारित आणि अतिरिक्त नियम व अटींच्या अधीन आहे.


