Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोला इंडिया ने 'हाफटाइम' क्षणांच्या नवीन सादरीकरणासाठी दिलजीत दोसांझ आणि जान्हवी कपूर...

कोका-कोला इंडिया ने ‘हाफटाइम’ क्षणांच्या नवीन सादरीकरणासाठी दिलजीत दोसांझ आणि जान्हवी कपूर यांच्‍यासोबत सहयोग केला

राष्ट्रीय, १५ एप्रिल २०२६: – कोका-कोला ने आज दिलजीत दोसांझ आणि जान्हवी कपूर यांचा समावेश असलेल्या आपल्‍या नवीन मोहिमेची घोषणा केली आहे, ज्याद्वारे दैनंदिन जीवनातील क्षणांमध्ये ‘कोका-कोला हाफटाइम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. या संकल्पनेचा मुख्य आधार विश्वास आहे की, हाफटाइमने दिवसाच्या कामात विरंगुळा देण्‍यासोबत पुन्‍हा ते काम करण्‍यासाठी उत्‍साह निर्माण केला पाहिजे.

कोका-कोला त्याच्या स्वादिष्ट आणि टवटवीत करणार्‍या चवीसह उत्साहवर्धक विश्रांती देण्‍यामध्‍ये भूमिका बजावते, ज्यामुळे दैनंदिन अनुभवांमध्ये जिव्हाळा आणि नाते निर्माण होते. हा सोपा आणि सहज उपलब्ध उपाय बनतो, एक लहान पण प्रभावी हाफटाइम, जो व्‍यक्तींना वर्तमानाचा आनंद घेण्यास, आपल्या माणसांच्या अधिक जवळ येण्यास आणि सभोवतालच्या वातावरणामध्‍ये सामावून जाण्‍यास मदत करतो.

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्‍ट एशियाचे मार्केटिंगचे सीनियर डायरेक्टर कार्तिक सुब्रमण्यम म्हणाले, “आज ग्राहक पूर्वीपेक्षा अधिक व्यस्त आणि वेगवान जीवन जगत आहे. तरीही, त्यांना अशा लहान आणि अर्थपूर्ण विश्रांतीची ओढ आहे, जी त्यांना वर्तमानात उत्‍साहित राहण्यास मदत करेल. आपल्या खास चवीसाठी ओळखले जाणारे कोका-कोला दीर्घकाळापासून या दैनंदिन सवयींचा भाग राहिले आहे. ही मोहीम निदर्शनास आणते की, साधा हाफटाइम व्‍यक्तींना त्यांच्या सभोवतालच्या महत्त्वाच्या गोष्टींच्या जवळ आणू शकतो.”

व्‍हीएमएलद्वारे नेतृत्वित डब्‍ल्‍यूपीपी ओपन एक्‍सने संकल्पित केलेल्या या मोहिमेच्‍या जाहिराती जीवनातील ‘विरंगुळा’ घेतल्‍या जाणाऱ्या क्षणांमधील सौंदर्य शोधतात, असे क्षण जेव्‍हा आपण शारीरिकरित्या तिथे असतो, पण मानसिकरित्या कुठेतरी हरवलेले असतो. मग ते तालमीच्या ओघात मग्न असलेले दिलजीत दोसांझ असोत किंवा मैत्रिणींसोबत असताना विचारात हरवलेली जान्हवी कपूर असो, कोका-कोला रिफ्रेशिंग उत्‍साह जागृत करण्‍याचे काम करते. कोका-कोलाचा एक घोट तुमचे लक्ष पुन्हा जगाकडे वळवतो आणि साध्या विश्रांतीचे रूपांतर एका उत्साहवर्धक अनुभवात करतो, जो तुम्हाला वर्तमानाशी जोडून ठेवतो.

या जाहिरातीबद्दल मत व्यक्त करत व्‍हीएमएलचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर नकुल शर्मा आणि तीर्थ घोष म्हणाले, “आमच्यासाठी ही मोहीम एका वैश्विक मानवी सत्याला मांडणारी होती. आपण सर्वजण वर्तमानात जगू इच्छितो, पण आधुनिक जीवन आपल्याला सतत त्यापासून दूर खेचत असते. आम्हाला दाखवायचे होते की कोका-कोला केवळ एक पेय नाही, तर पुन्हा एकदा स्वतःशी आणि सभोवतालच्या जगाशी जोडला जाण्याचा एक क्षण आहे. कोका-कोला साधे आणि उत्साहवर्धक बीट (ताल) आहे, जे तुम्हाला पुन्हा वर्तमानात परत येण्यास मदत करते. आपले मन कुठेतरी हरवलेले असते, तेव्हा हा क्षण त्या स्थितीला उत्‍साहपूर्ण अनुभवात बदलतो. हे सर्व काही वर्तमानामध्‍ये असण्याचा आनंद पुन्हा मिळवून देण्याबद्दल आहे.”

दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. तसेच या मोहिमेला टेलिव्हिजन, डिजिटल आणि सोशल मीडियाची प्रबळ साथ मिळाली आहे. स्थानिक स्तरावरील कथांच्या माध्यमातून ही संकल्पना अधिक प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. यामध्ये दिलजीत दोसांझ असलेली जाहिरात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे, तर जान्हवी कपूर तामिळ आवृत्तीत आणि एका खास कन्‍नड जाहिरातीमध्‍ये झळकणार आहेत.

या मोहिमेला डॉन भट यांनी संगीतबद्ध केलेल्या मूळ साउंडट्रॅकची जोड देण्यात आली आहे. विवेक हरीहरन आणि आरिफा रिबेलो यांनी आपला आवाज दिला आहे, ज्यामुळे जाहिरातीला एक आगळीवेगळी रेट्रो ओळख मिळाली आहे. या स्थानिक कथांच्या माध्यमातून कोका-कोला प्रेक्षकांशी आपले नाते अधिक दृढ करत आहे, तसेच एका साध्या कोका-कोला हाफटाइमच्या क्षमतेला साजरे करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments