Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedलहान मुलांमधील फॅटी लिव्हर फक्त यकृतापुरती मर्यादित समस्या नव्हे - तज्ञ

लहान मुलांमधील फॅटी लिव्हर फक्त यकृतापुरती मर्यादित समस्या नव्हे – तज्ञ

पुणे,१६ एप्रिल 2026 : लहान मुलांमधील फॅटी लिव्हर फक्त यकृतापुरती मर्यादित समस्या नाही,मात्र पालकांसाठी आश्वासक बाब म्हणजे याचे लवकर निदान केल्यास ही समस्या बरी होऊ शकते.
19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिनानिमित्त सर्व वयोगटातील आणि खास करून लहान मुलांमधील फॅटी लिव्हरच्या समस्येबाबत जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे,कारण त्याचा दूरगामी विपरीत परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर होऊ शकतो.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील पोटविकार तज्ञ (गॅस्ट्रोइंटेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि जीआय एंडोस्कोपिस्ट) डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की,लहान मुलांमध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.या अवस्थेला मेटाबोलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिएटॉटिक लिव्हर डिसीज (एमएएसएलडी) असे म्हणतात.मात्र ही अवस्था फक्त प्रौढांमध्येच नव्हे तर अगदी 10 वर्षाच्या लहान मुलांमध्ये देखील आता दिसू लागली आहे.

जागतिक पातळीवर लहान मुलांमधील स्थुलता ही समस्या लक्षणीयरित्या वाढत असून फॅटी लिव्हरसाठी हे मुख्य कारण ठरत आहे. त्याचबरोबर अनुवंशिकता,अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थ हे देखील जोखीमकारक आहेत.अशा खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लठ्ठ न दिसणाऱ्या मुलांच्या यकृतामध्ये देखील चरबी साठण्यास सुरूवात होते,याला लिन – एनएएसएच असे म्हणतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, लहान मुलांमध्ये मैदानी खेळांऐवजी वाढत चाललेली बैठी जीवनशैली,लठ्ठपणा यामुळे फॅटी लिव्हरची जोखीम वाढत आहे.जीवनशैली न बदलल्यास कालांतराने गुंतागुंत सुरू होऊन यकृत निकामी होण्याच्या दिशेने वाटचाल होऊ शकते.

ते पुढे म्हणाले की,लहान मुलांमधील फॅटी लिव्हर हे केवळ यकृताशी निगडीत समस्या नसून चयापचयाशी निगडीत समस्या होऊ लागते.यामुळे टाईप 2 मधुमेह,उच्च रक्तदाब आणि भविष्यात हृदयाच्या समस्या निर्माण होण्याच्या दृष्टीने जोखीमकारक ठरू शकते.हाडांची घनता आणि त्यांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.मात्र पालकांसाठी यातील आश्वासक बाब ही आहे की,लवकर निदान झाल्यास फॅटी लिव्हरची समस्या बरी होऊ शकते.शारीरिक हालचाल,सक्रीय जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल हे यकृतामध्ये साठलेली चरबी कमी करू शकते. लवकर निदानासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट किंवा फायब्रो स्कॅनचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments