Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन*

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन*

*

पुणे, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत एप्रिल २०२६ महिन्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रोजगार मेळाव्याचे २० एप्रिल रोजी वीर फिरंगोजी नरसाळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दौंड, २१ एप्रिल रोजी मालोजीराजे भोसले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इंदापूर, २२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, २३ एप्रिल रोजी शहीद राजगुरु शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड (राजगुरुनगर), ता. खेड आणि २७ एप्रिल रोजी तात्या टोपे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिरूर येथे आयोजन करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, पदविका, पदवीधर व पदव्युत्तर अशा विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त पदे उपलब्ध असणार आहेत. नामांकित उद्योजक या मेळाव्यात सहभागी होणार असून उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांची सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in⁠ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच मेळाव्यास उपस्थित राहताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती व किमान ५ बायोडेटा सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे, ४८१ रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ वर संपर्क साधावा. बेरोजगार उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेश धर्माधिकारी, कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments