Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedवर्ल्ड लाफ्टर डे निमित्त नेटफ्लिक्सच्या कपिल शोचा खास एपिसोड; समय रैना आणि...

वर्ल्ड लाफ्टर डे निमित्त नेटफ्लिक्सच्या कपिल शोचा खास एपिसोड; समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया एकत्र येऊन जबरदस्त धमाका करतील

मुंबई: काही क्षण ट्रेंड होतात आणि काही “मस्ट वॉच” बनतात, आणि हा एपिसोड त्यापैकीच एक आहे जो पूर्णपणे हसण्याने भरलेला आहे. वर्ल्ड लाफ्टर डे निमित्त नेटफ्लिक्स कॉमेडीला खास बनवत द ग्रेट इंडियन कपिल शो (TGIKS) चा एक स्पेशल एपिसोड घेऊन येत आहे. या एपिसोडमध्ये कॉमेडीचे बादशाह कपिल शर्मा यांच्यासोबत नव्या पिढीतील कलाकार समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया देखील दिसणार आहेत. हा एक मजेदार क्रॉसओव्हर आहे, ज्यामध्ये जोक्स आणि सतत हसवणारे क्षण पाहायला मिळणार आहे.

 

याबाबत कपिल शर्मा म्हणाला, “आमच्या शो ला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम हे आम्हाला नेहमी काहीतरी नवीन आणि मजेदार कंटेंट बनवण्यासाठी प्रेरणा देते. वर्ल्ड लाफ्टर डे निमित्त आम्ही नेटफ्लिक्ससोबत मिळून एक खास एपिसोड तयार केला आहे, जो खूप मजेदार आणि भरपूर हसवणारा आहे. या एपिसोडमध्ये समय रैना आणि रणवीर अल्लाहबादिया देखील त्यांच्या खास स्टाईलमध्ये सहभागी होत आहेत, ज्यामुळे शो आणखी खास होणार आहे. आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की लोकांनी आमच्यासोबत हसत-हसत आनंदाने हा दिवस साजरा करावा.”

 

जसजशी चर्चा अधिक रंजक होत जाते, तसा स्टेज अचानक टीजीआयकेएस न्यूज डिबेटमध्ये बदलतो. ज्यात सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत दिसतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे टीजीआयकेएसच्या खास स्टाईलमध्ये कृष्णा अभिषेक ‘मोना’ आणि किकू शारदा ‘सोना’च्या भूमिकेत एंट्री करतात. दोघे मिळून संपूर्ण शो ला शेवटपर्यंत हसण्याने आणि धमाल मजेशीर वातावरणाने भरून टाकतात.

 

वेगवेगळ्या कलाकारांची खास स्टाईल आणि टीजीआयकेएसची धमाल कॉमेडी एकत्र येऊन हा स्पेशल एपिसोड वर्ल्ड लाफ्टर डे साजरा करण्यासाठी अगदी परफेक्ट ठरतो, जिथे प्रत्येक क्षण हसण्याने भरलेला असतो.

 

द ग्रेट इंडियन कपिल शो चा हा स्पेशल एपिसोड 2 मे रोजी फक्त नेटफ्लिक्सवर पाहायला

मिळेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments