Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाज माध्यमे दूर सारून स्वतःला ओळखा अभिनेते संजय मिश्रा : एमआयटी डब्ल्यूपीयूत...

समाज माध्यमे दूर सारून स्वतःला ओळखा अभिनेते संजय मिश्रा : एमआयटी डब्ल्यूपीयूत दादासाहेब फाळके स्टुडिओचे उद्घाटन राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाची घोषणा

पुणे, ३० एप्रिलः ” आपण स्वतःला विसरुन जग शोधत आहोत. अशा वेळेस समाज माध्यमे दूर सारुन स्वतःला ओळखा. गर्दीचा भाग होऊ नका. स्वतंत्र विचार करायला शिका.” असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट विद्यालयात अत्याधुनिक स्टुडिओचे उद्घाटन, राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ आणि कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या विवेकानंद सभागृहात पार पडला. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता संतोष जुवेकर, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट विद्यालयाचे मेंटॉर अभिजित पानसे आणि सिनेमॅटोग्राफर प्रशांत महोपात्रा सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल विश्वनाथ कराड हे अध्यक्षस्थानी होते.

तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस व अरुण प्रकाश उपस्थित होते.

यावेळी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन भाषणात सांगितले की, ” दादासाहेब फाळके स्कूलचे विद्यार्थी निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव रोशन करतील याची मला खात्री आहे. आज मुंबई येथे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात देश विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच प्रमाणे या विद्यापीठात ही चित्रपटाचे ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या असेल.”

डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, समाज शिक्षणाचे काम चित्रपट प्रभावीपणे करु शकतात. त्यामुळे शिक्षण संस्थाआणि अभिनेते सोबत सामाज शिक्षणाचे काम केले पाहिजे. व्यावसायिक तत्व निश्चितच पाळले जाते, पण शिक्षण व्यवसाय होऊ शकत नाही. जे आम्ही कायम जपले आहे. लोकशाही मूल्यांचे शिक्षण आम्ही देतो. मानसिकदृष्ट्या कायम आपण पाश्चात्य देशांना श्रेष्ठ मानले आणि स्वतःला दुय्यम लेखले आहे. वास्तव तसे नाही. माणूस म्हणून पुढे येऊन ठोस कामे केली पाहिजेत.

नागराज मंजुळे म्हणाले, कुठलाही चित्रपट करायचा असेल तर साधन अत्यंत आवश्यक आहे. त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे डोक्यात विचार हवं आणि त्यात स्पष्टता हवी. ज्या फिल्म फेस्टिवलची घोषणा करण्यात आली आहे ते अत्यंत महत्वाचे आहे.

या नंतर अभिनेता संतोष जुवेकर यांनी शुभेच्छा दिल्यात.

एमआयटी डब्ल्यूपीयूतील स्टुडिओ आशियातील सर्वेत्कृष्ट आहे असे डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावनेत सांगितले. अभिजित पानसे यांनी स्वागत पर भाषण केले.

सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट यांनी केले. अरुण प्रकाश यांनी आभा

र मानले.बॉक्सः

फेस्टिवल मधून विश्व बंधुता संदेश

रेगे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी जगातील पाहिले स्टूडेंट फिल्म फेस्टिवल नोव्हेंबरमध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूत होईल अशी घोषणा केली. यात विजेत्यांना जवळपास १ लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विश्व बंधुता हा संदेश या फेस्टिवलच्या माध्यमातून पुढे घेऊन जाऊ.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments