Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedॲबी लायटिंग तर्फे पुण्यात एक्सपिरियन्स सेंटर सुरू

ॲबी लायटिंग तर्फे पुण्यात एक्सपिरियन्स सेंटर सुरू

पुणे,8 मे 2026 : भारतातील आघाडीच्या आर्किटेक्चरल लायटिंग उत्पादकांपैकी एक असलेल्या ॲबी लायटिंग तर्फे पुण्यात एक्सपिरियन्स सेंटर सुरू केल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेले हे सेंटर अत्याधुनिक,पूर्णत: इंटरॲक्टिव्ह आणि स्पेसिफिकेशन-ग्रेड स्पेस आहे. येथे ग्राहकांना आधुनिक लायटिंग सोल्युशन्सचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. मुंबईतील फ्लॅगशिप सेंटर नंतर देशातील हे कंपनीच्या मालकीचे आणि कंपनीद्वारेच संचालित दुसरे एक्सपिरियन्स सेंटर असून,पुण्यातील पहिलेच समर्पित आर्किटेक्चरल लायटिंग एक्सपिरियन्स सेंटर आहे. कंपनीचे चेन्नई,बंगळुरू,अहमदाबाद आणि इतर शहरांमध्ये पार्टनर नेटवर्कद्वारे यापूर्वीच अस्तित्व आहे.

 

कंपनीचा विस्तार हा सातत्यपूर्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर होत असून, ॲबी लायटिंग ने वर्षागणिक 20 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

 

पुण्यातील एक्सपिरियन्स सेंटर हे पुणेस्थित स्पार्क डिझाईन यांच्या सहकार्याने उभारण्यात आले असून,येथे 100 हून अधिक लाईव्ह ल्युमिनेअर्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.हे सर्व अत्याधुनिक वायरलेस ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाद्वारे एकत्रित आणि नियंत्रित केले जात आहे. हे एक्सपिरियन्स सेंटर पुणे,कोल्हापूर,सोलापूर,सांगली आणि लोणावळा-पवना परिसरातील डिझाईन प्रॅक्टिससोबत आर्किटेक्ट फोरम्स,सीपीडी सत्रे आणि सहयोगी कार्यशाळांचे आयोजनही करेल.

 

यावेळी बोलताना ॲबी लायटिंगच्या संचालक रचना बजाज जोशी म्हणाल्या की,दीर्घकाळापासून पुणे हे आमच्या प्रवासाचा भाग राहिले आहे. आम्ही या शहरातील अनेक महत्त्वाच्या कार्यालयांना,हॉटेल्सना आणि संस्थांना सेवा दिली आहे. आम्ही उच्च दर्जाचे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या आर्किटेक्ट्स आणि डिझाईनर्ससोबत आम्ही काम केले आहे. आज पुणे हे भारतातील सर्वाधिक डिझाईन जाणकार असलेल्या बाजारपेठांपैकी एक बनले आहे.

 

ॲबी लायटिंगच्या माध्यमातून सूचित केलेले प्रत्येक उत्पादन हे कंपनीच्या पालघर सुविधेमध्ये उत्पादित केले जाते.गेली अनेक वर्षे ॲबी लायटिंगने पुण्यातील अनेक नामवंत आर्किटेक्टस आणि डिझाईन कंपन्यांबरोबर सहकार्य केले

आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments