Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedजियो हॉट स्टार आणि स्वीगी ने मोठ्या प्रमाणावर ‘मॅच-टाइम कॉमर्स’ची सुरुवात करत...

जियो हॉट स्टार आणि स्वीगी ने मोठ्या प्रमाणावर ‘मॅच-टाइम कॉमर्स’ची सुरुवात करत इंटरअॅक्टिव्ह स्ट्रीमिंगला दिली नवी ओळख

 

 

या अनोख्या उपक्रमामुळे 690 हून अधिक शहरांमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगदरम्यान रिअल-टाइम आणि संदर्भानुसार फूड ऑर्डरिंगची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रेक्षकांचा अनुभव खंडित न होता अॅपमध्येच सहज व्यवहार करता येत आहेत.

लॉन्चपासून आतापर्यंत जियो हॉट स्टार वरील इन-अॅप ऑर्डरिंग सुविधेचा अनुभव 3.7 कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी घेतला आहे.

 

मुंबई, 8 मे 2025 : स्ट्रीमिंगच्या भविष्यात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत जियो हॉट स्टार ने स्वीगी (Swiggy Ltd, NSE: SWIGGY / BSE: 544285) यांच्या भागीदारीत आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये थेट समाविष्ट केलेली अनोखी इन-अॅप फूड ऑर्डरिंग सुविधा सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट हंगामात 37 मिलियनपेक्षा अधिक वापरकर्त्यांनी या सुविधेचा अनुभव घेतला आहे. लाईव्ह क्रीडा प्रक्षेपण, संदर्भानुसार दिसणारे ट्रिगर्स आणि अखंड इन-अॅप चेकआउट यांचा संगम या सुविधेत करण्यात आला असून, केवळ माहिती किंवा शोधापुरते मर्यादित न राहता स्ट्रीमिंगदरम्यान प्रत्यक्ष रिअल-टाइम व्यवहार शक्य करणारी ही नवी क्षमता ठरली आहे.

 

690 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधेमुळे प्रेक्षकांना लाईव्ह स्ट्रीम न सोडताच रेस्टॉरंट्स पाहणे, सामन्यादरम्यान मिळणाऱ्या विशेष आणि आकर्षक ऑफर्स अनलॉक करणे, ऑर्डर देणे तसेच डिलिव्हरी ट्रॅक करणे शक्य होत आहे. मोबाइलसाठी खास तयार करण्यात आलेली ही सुविधा जियो हॉट स्टार प्लॅटफॉर्मवरच शोधापासून चेकआउटपर्यंतचा संपूर्ण अनुभव सहज आणि अखंडपणे देते. संदर्भानुसार संवाद साधणारे फीचर्स आणि लाईव्ह प्रक्षेपणासाठी खास तयार केलेले विशेष क्षण यांच्या माध्यमातून चाहत्यांना अधिक प्रभावी, फायदेशीर आणि व्यवहारकेंद्री मॅच-टाइम अनुभव मिळत आहे.

 

या सुविधेचा विस्तार वाढत असताना सामन्यादरम्यानच्या ऑर्डरिंगमधील काही महत्त्वाचे ट्रेंड समोर येत आहेत. लाखो वापरकर्ते इन-स्ट्रीम ऑर्डरिंग अनुभवात सक्रियपणे सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. लाईव्ह सामन्यांदरम्यान सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणून बर्गरने बिर्याणीला मागे टाकले असून, चाहत्यांच्या आवडीत होत असलेला बदल यातून स्पष्ट होत आहे. तसेच अचानक ऑर्डर देण्याचे प्रमाणही वाढले असून, एका वापरकर्त्याने संपूर्ण हंगामात तब्बल 34 ऑर्डर्स दिल्या आहेत. विशेष म्हणजे, एका व्यवहारात एका वापरकर्त्याने 100 हून अधिक बर्गरची ऑर्डर दिली. महत्त्वाच्या सामन्यांच्या क्षणी समूहाने मोठ्या प्रमाणात केलेल्या ऑर्डरिंगचे हे उदाहरण मानले जात आहे.

 

इन-अॅप ऑर्डरिंग विभागाला वापरकर्त्यांकडून सातत्याने मोठा प्रतिसाद मिळत असून, पुन्हा-पुन्हा भेट देण्याचे प्रमाण आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांमध्ये वाढ दिसून येत आहे. एका वापरकर्त्याने तब्बल 6801 रुपयांची एकाच वेळी ऑर्डर दिली, तर दुसऱ्या वापरकर्त्याने मॅच-टाइम ऑफर्सच्या माध्यमातून 12947 रुपयांपर्यंत बचत केली. यासोबतच, काही ऑर्डर्स अवघ्या 10 मिनिटे 42 सेकंदांत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आल्याने जलद डिलिव्हरीचाही अनुभव मिळत आहे.

 

मुंबई इंडियन्सच्या सामन्यांदरम्यान सर्वाधिक ऑर्डरिंगचे प्रमाण नोंदवण्यात आले, तर आरसीबी विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात एका सामन्यातील सर्वाधिक ऑर्डर्सचा उच्चांक पाहायला मिळाला. सामन्यांच्या रंगतदार आणि तणावपूर्ण वातावरणाचाही प्रेक्षकांच्या वर्तनावर प्रभाव पडत असून, रोमांचक सामन्यांदरम्यान ऑर्डरिंगमध्ये मोठी वाढ होत आहे. हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्ली ही शहरे एकूण ऑर्डरिंग ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत, तर पाटणा आणि पुणे यांसारख्या उदयोन्मुख शहरांतूनही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला जात आहे.

 

“पाहताना ऑर्डर करा” या ग्राहकांच्या मजबूत सवयीवर आधारित या सहकार्यामुळे दोन अग्रगण्य कंपन्या एकत्र येऊन अधिक जोडलेला आणि सहज इन-स्ट्रीम अनुभव देत आहेत. एआय-आधारित डिस्कव्हरी, इंटरअॅक्टिव्ह फॉरमॅट्स आणि रिअल-टाइम कॉमर्सच्या माध्यमातून मॅच-टाइम अनुभव अधिक प्रभावी करण्याच्या जियो हॉट स्टार च्या व्यापक दृष्टिकोनाला ही भागीदारी बळकटी देते. त्याचबरोबर, वापरकर्त्यांना सर्वोत्तम सोय आणि सहज सेवा देण्याच्या स्वीगी च्या वचनबद्धतेलाही ती अधोरेखित करते.

 

या उपक्रमाबाबत बोलताना जियो स्टार चे स्पोर्ट्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईशान चटर्जी म्हणाले, “आपण अशा जगाकडे वाटचाल करत आहोत जिथे कंटेंट आणि कॉमर्स यांच्यातील सीमा अधिकाधिक कमी होत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आता स्वतंत्र माध्यम म्हणून न राहता, वापरकर्त्यांना त्या क्षणी काय हवे आहे याचा अंदाज घेऊन ते शक्य करणारे एकात्मिक प्लॅटफॉर्म बनत आहेत. लाईव्ह क्रीडा आणि रिअल-टाइम कॉमर्स यांना एकत्र आणणे हे त्या भविष्यातील सुरुवातीचे उदाहरण आहे, जिथे सहभाग म्हणजे केवळ पाहणे नाही, तर त्या क्षणी कृती करणेही आहे.

 

या भागीदारीबाबत बोलताना स्वीगी फूड मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर म्हणाले, “लाईव्ह क्रीडा पाहण्याचा अनुभव आता अत्यंत इंटरअॅक्टिव्ह झाला आहे, जिथे चाहते सामना पाहतानाच अनेक गोष्टी एकाच वेळी करत असतात आणि तरीही खेळात पूर्णपणे गुंतलेले राहतात. सामना पाहताना खाद्यपदार्थ ऑर्डर करणे ही अनेक प्रेक्षकांसाठी आता सवयीची गोष्ट बनली आहे. जियो हॉट स्टार सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे चाहते त्यांचा आवडता सामना आणि आवडते खाद्यपदार्थ या दोन्हींचा एकाच वेळी आनंद घेऊ शकतात, तेही कोणतीही गोष्ट चुकविल्याशिवाय.

 

मॅचदरम्यानच्या उत्स्फूर्त क्षणांना आणि चाहत्यांच्या वर्तनाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेल्या ‘मॅच ऑन, मंच ऑन’ या दमदार मोहिमेमुळे हा अनुभव अधिक प्रभावी बनला आहे. या मोहिमेचा संदेश आहे : “इस क्रिकेट सीजन… जियो हॉट स्टार पे ‘स्वीगी’ करो. टॅप. ऑर्डर. ईट. रिपीट. मॅच ऑन. मंच ऑन.” डिजिटल, सोशल मीडिया तसेच जियो स्टार च्या विस्तृत दूरदर्शन नेटवर्कवर राबविण्यात येणारी ही मोहीम ऑन-एअर क्षण आणि इन-अॅप कृती यांना सहजपणे जोडते. संदर्भानुसार आणि रिअल-टाइम अनुभवांच्या माध्यमातून सामना पाहण्याचा अनुभव खंडित न करता चाहत्यांना खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याची सुविधा देत, प्लॅटफॉर्म कशाप्रकारे क्रीडाप्रेमींच्या गरजा पूर्ण करत आहे हे या मोहिमेतून दाखवण्यात आले आहे.

 

ही भागीदारी जियो हॉट स्टार च्या अधिक प्रभावी, सहज आणि अनुभवसमृद्ध व्ह्यूइंग इकोसिस्टम उभारण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे, जिथे मनोरंजन केवळ पाहण्यापुरते मर्यादित न राहता अधिक संदर्भाधारित आणि इंटरअॅक्टिव्ह अनुभवांमध्ये रूपांतरित होत आहे.

‘शॉप द लूक’, ‘कन्वरसेशनल व्हॉईस डिस्कव्हरी’ यांसारख्या नवकल्पना, इंटरअॅक्टिव्ह व्ह्यूइंग फॉरमॅट्स, कॉमर्स-आधारित इंटिग्रेशन्स आणि वैयक्तिकृत सहभाग अनुभवांच्या माध्यमातून आजच्या प्रेक्षकांना मनोरंजन कसे शोधायचे, अनुभवायचे आणि त्यात सहभागी व्हायचे यानुसार प्लॅटफॉर्म सा

तत्याने विकसित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments