Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedपेशवेकालीन श्री उमामहेश्वर मंदिरात मोगरा महोत्सव* वासंतिक चंदन उटी सोहळा ;...

पेशवेकालीन श्री उमामहेश्वर मंदिरात मोगरा महोत्सव* वासंतिक चंदन उटी सोहळा ; भजन, कीर्तन आणि भक्तीगीतांचे कार्यक्रम

 

 

पुणे : शुक्रवार पेठ येथील राजा दिनकर केळकर संग्रहालयासमोरील पेशवेकालीन श्री उमामहेश्वर मंदिरात ‘श्रीं’ चा वासंतिक चंदन उटी सोहळा आणि मोगरा महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला झाला. भगवान शंकरांच्या पिंडीवर मुखवटा व चंदन लेपन करण्यात आले होते.

 

आदिमाया प्रतिष्ठान पुणे तसेच नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसर आकर्षक विविधरंगी फुलांची सजावट, मोगऱ्याचा दरवळ आणि पारंपरिक रोषणाईने उजळून निघाला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.

 

सोहळ्यास नगरसेवक राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, कुणाल टिळक, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, देवेंद्र वडके यांसह श्री उमा महेश्वर मंदिर सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते. कमलेश कामठे, स्वामी भक्त परिवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

 

विविध भजनी सेवा मंडळांनी भजन, कीर्तन आणि भक्तीगीतांच्या माध्यमातून वातावरण भक्तिमय केले. श्री भागीरथी सेवा भजनी मंडळ, श्री स्वामी शंकर भजनी सेवा मंडळ, श्री गुरु माऊली भजनी सेवा मंडळ, श्री वटवृक्ष भजनी सेवा मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ मंडई मठ पुणे तसेच श्री स्वामी ॐ मल्हारी भजनी सेवा मंडळ यांनी सहभाग घेतला.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments