Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedधर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन...

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २० : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी अधिकृत संकेतस्थळावर वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

नोंदणीसाठी अर्जदाराकडे अनुज्ञप्ती, बॅज, वाहन परवाना, शिधापत्रिका, आधारकार्ड व पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांनी https://ananddighekalyankarimandal.org⁠ या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी. तरी सर्व ऑटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालक-मालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

 

ज्या सभासदांनी दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पुर्ण केलेली आहेत, तसेच १ मे २०२६ पर्यत धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक मालक कल्याणकारी मंडळाअंतर्गत सभासद नोंदणी केलेली आहे अशा सभासदांना सन्मान निधी योजनेअंतर्गत दहा हजार रुपये इतका लाभ देण्यात येणार आहे, असेही प्रसिद्धीपत्रकान्वे कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments