ब्रेन वॉश काय लेव्हलवर काम करते.एखाद्याला मारून टाकणे, त्यात आनंद मानणे, तो साजरा करणे, मृत्यू फारच स्वस्त आहे का ?
नक्षलवादी खरच ‘माणूस’ म्हणून जन्माला आले आहेत का? असे अनेक प्रश्न वारंवार मनात घोटाळत होते. सुन्न करून गेले – काल रात्री बस्तर पाहिला….
सुन्न करणारी सत्यकथा भीषण वास्तवता, त्यातील तीन घटना पाहून मात्र मनाची घालमेल थांबवत नाही.
भारताचा ध्वज फडकावल्याबद्दल नक्षलवाद्यांनी एका तरुणाचा ३६ वार करून त्याचा पत्नी आणि मुलीच्या समोर वेदनादायक मृत्यू,लहान बाळ आणि त्याविषयी कृत्य आणि एकमेकांना मारायला समोरासमोर आल्यावर आई – मुलगा भेटणे या तिन्ही घटना बस्तरचे धगधगीत वास्तव सांगतात.
जगामध्ये नक्षलवाद आणि त्यांचे समर्थक कसे कार्यरत आहेत आणि ते समाज आणि कायद्याचे काय नुकसान करू पाहत आहेत, याचे छान सादरीकरण.सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय अचूक दिग्दर्शन…
किती ब्रेन वॉश झाले हे वारंवार चित्रपटात पाहायला मिळते. समाजातील गडद वास्तव सर्वांसमोर आणण्यात आले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला भूतकाळातील आणि अजूनही संबंधित समस्यांबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न धाडसाचा आहे.
आपल्या देशात काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी चित्रपट अवश्य पहा.
नक्षलवादाची समस्या आणि त्यामागील पांढर पेशी लोकांचे काळे सत्य या चित्रपटातून समोर येते. हा एक ज्वलंत प्रश्न मांडणारा देशभक्तीपर चित्रपट आहे.
न टाळणाऱ्या वास्तवांचा सामना करत मरणप्राय यातना सहन करत, सतत असुरक्षित वातावरणात आपल्या देशातील नक्षलग्रस्त नागरिक किती भयाण जिणे जगतात त्या मानाने आपण….. !!!
अंजली तागडे


