Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ*

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ*

 

पुणे, दि. २१ (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्वेता पवार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचाराला विरोध करण्याची तसेच शांतता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची शपथ दिली.

दहशतवाद व हिंसाचारामुळे समाजात भीती, अस्थिरता आणि द्वेषाचे वातावरण निर्माण होते. अशा प्रवृत्तींपासून दूर राहून लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच समाजात शांतता, बंधुता आणि परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागावी, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.

या शपथविधी कार्यक्रमात नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments