पुणे, २२ मे २०२६ : मॅरिएट बॉनवॉयच्या नवीन लॉयल्टी ट्रेंड्स रिपोर्ट २०२६ नुसार, एपीईसी मधील 89% प्रवासी किमान एका लॉयल्टी प्रोग्राममध्ये सहभागी आहेत. प्रवासाच्या प्राधान्य क्रमांबरोबरच दैनंदिन मूल्यांच्या अपेक्षा आणि स्थानिक बाजारपेठेतील गतिशीलता यांचा त्यावर प्रभाव पडत आहे. या ट्रेंड्स रिपोर्ट नुसार, प्रवासाबाबत आवडी निवडी या लॉयल्टी एंगेजमेंट साठी सर्वात मजबूत संकेत ठरत आहे.ते कशासाठी प्रवास करतात यावरून लॉयल्टी बेनिफिट्स कसे कमवतात व त्याचा वापर करतात हे ठरत आहे. या रिपोर्ट नुसार एपीईसी मध्ये सर्वोत्तम पाच प्राधान्यक्रम ओळखले गेले असून त्यामध्ये फूड अँड डायनिंग,निसर्ग भ्रमण,शॉपिंग,स्थानिक सांस्कृतिक बाबींमध्ये सहभाग,रिचार्ज आणि डिस्कनेक्ट यांचा समावेश आहे.


