Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवंगत पंतप्रधान लाल बहादूर ‘शास्त्री पुतळ्याचे सुशोभीकरण, शासकीय नियमावली नुसार व्हावे’..!* ...

दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर ‘शास्त्री पुतळ्याचे सुशोभीकरण, शासकीय नियमावली नुसार व्हावे’..!* – *पुतळा समिती निमंत्रक गोपाळदादा तिवारी* *‘शिवसेना – काँग्रेस’ आंदोलनास यश …!*

 

 

पुणे : दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर ‘शास्त्री पुतळ्याचे सुशोभीकरण, शासकीय नियमावली नुसार व्हावे’ खाजगी बिल्डर’च्या पसंतीने नव्हे अशी मागणी – पुतळा समिती निमंत्रक गोपाळदादा तिवारी यांनी मनपा प्रशासना सोबतच्या बैठकीत केली.

नवी पेठेतील ‘८० फूटी_शास्त्री रोड’ वरील दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळा – परीसराचे खाजगी विकसाकडून ‘आयलंड सुशोभीकरणाच्या’ नावे तोड – फोड करण्यात आल्याचे स्थानिक शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्याने, त्यांनी हरकत घेऊन पुणे मनपा भवन समोर आंदोलन सुरु केले होते या आंदोलनाची दखल घेऊन पुणे मनपा प्रशासनाने चर्चे साठी मुख्य अभियंता कार्यालयात बैठकीस बोलवण्यात आले होते.

 

सदाशीव पेठेतील (मेघराज कार्यकर्त्यांना ‘शास्त्री पुतळा – स्थापनेचा’ ईतिहास माहीत असल्याने, सदरची बाब त्यांनी शास्त्री पुतळ्याचे प्रवर्तक व पुतळा समितीचे निमंत्रक गोपाळदादा तिवारी यांचे निदर्शनास आणली असता, त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याॉनी ‘वेगळे आंदोलन’ न करता शिवसेने’च्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला व पुतळा समिती’चे वतीने पुणे मनपा आयुक्तांना लेखी हरकतीचे पत्र ही दीले.

३ दिवस चाललेल्या आंदोलना नंतर मनपा प्रशासना’ च्या वतीने मुख्य अभियंता यांचे कार्यालयात झालेल्या बैठकीत पुतळा समितीचे निमंत्रक, माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी यांनी १२ मे १९८९ रोजी पुणे मनपा’स शास्त्री पुतळा भेट देतांनाची जुनी छाया चित्रे, वृत्तपत्रांची कात्रणे सादर केली.

राष्ट्रीय मानांकने ठरलेल्या राष्ट्रपुरषांचे, “दिवंगत पंतप्रधानांची स्मारके व पुतळे हे शासकीय गँझेट व नियमावली नुसार सभोवतालची मोकळीजागा सोडून, कठडे इ बसवुन त्याचे अनावरण करण्यात येत असल्याचे गोपाळदादा तिवारी यांनी या वेळी संबंधितांच्या निदर्शनास आणले.

यावेळी मुख्य अभियंता श्री पावस्कर, उप अभियंता बिपीन शिंदे सह, शिवसेना प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, गटनेते नितीन गावडे , प्रतिक आल्हाट, दत्ता घूले, अनंता घरत सह काँग्रेसचे सागर धाडवे, आशिश गुंजाळ, नंदकुमार पापळ, शशांक पाटील, करूणा घाडगे, मनिषा फाटे इ उपस्थित होते.

माझ्या “नारायण पेठ ते गांजवे चौक” या तत्कालीन जुन्या प्रभागातील, शास्त्री रोड वर भारतरत्न लाल बहादूर शास्त्रींचा पुतळा असावा याच भावनेने, या परिसरातील क्रिकेट क्लब, सामाजिक मंडळ व मित्र परिवार यांचे सहकाऱ्यातून आपल्याच पुढाकाराने घेऊदिवंगत पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजी यांचा पुतळा शिल्पकार बी आर खेडकर यांचे कडून तयार करवून तत्कालीन मावळते ‘महापौर अॅड. अंकुशजी काकडे व होणारे महापौर बाळासाहेब राऊत’ यांचे उपस्थिती’मध्ये, शुक्रवार दि १२ मे १९८९ रोजी पुणे महापालिकेचे महापौर कार्यालयात भेट दिल्याचे सांगीतले.

शास्त्री रोड वरील मांगीर बाबा’ चौक येथील ‘गोलाकार आयलंड’ मध्ये सदर शास्त्री पुतळ्याची स्थापना पुणे मनपा तर्फे शासकीय नियमावलीनुसार करण्यात येऊन तत्कालीन मुख्यमंत्री मा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हस्ते पुतळ्याचे अनावरण ही झाले.

विशेष म्हणजे स्व. लाल बहादूर शास्त्रीजी यांचे चिरंजीव श्री अनिलजी शास्त्री व कुटुंबीय, पुणे शहरात आले असता त्यांनी या स्मारकास भेट देऊन आम्हा कार्यकर्त्यांचे कौतुक ही केले व पुणे मनपा’स धन्यवाद ही दिले. असेही गोपाळदादा तिवारी यांनी या वेळी सांगीतले.

सदर नुतनीकरणा बाबत पुतळा समिती इ ना कोणतीही कल्पना न देता.. वा नियोजीत प्रकल्प व नकाशे न दाखवता, तोड – फोडीचे काम सुरु केल्याचे

निदर्शनास येताच, भारतरत्न शास्त्रीजींचे प्रती राष्ट्रप्रेमाच्या कर्तव्यशील भुमिकेतून, स्थानिक (उबाठा) शिवसैनिकांनी हरकत घेऊन आंदोलन सुरु करून सदरची बाब लक्षात आणून दिल्या बद्दल गोपाळदादा तिवारी यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व धन्यवाद ही दिले.

सदारचा पुतळा पुणे शहरातील मोठ्या संख्येने असलेल्या विद्यार्थी – स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी यांची वर्दळ असलेल्या भागात असून, देशास अधिक सक्षम, स्वनिर्भर बनवणाऱ्या व देशास “जय जवान – जय किसान”चा नारा देणाऱ्या दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची सदैव प्रेरणा देत आला असल्याचे ही त्यांनी सांगीतले.

—————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments