Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedएक वेळचे जेवण आयुष्य बदलू शकते: मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाने...

एक वेळचे जेवण आयुष्य बदलू शकते: मलाबार ग्रुपच्या ‘हंगर फ्री वर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश टाकला

 

June 5, 2026: जागतिक भूक दिनानिमित्त, मलाबार ग्रुपच्या मानवतावादी उपक्रम ‘हंगर फ्री वर्ल्ड’ने आपल्या स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट: इम्पॅक्ट स्टोरीज – एका दैनंदिन जेवणामुळे कसे बदलते आयुष्य” या अहवालाद्वारे अधोरेखित केला. या अहवालात, थनल संस्थेद्वारे प्रत्यक्ष स्तरावर राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन अन्न वितरण मोहिमेमुळे रस्त्यावर राहणाऱ्या असुरक्षित व्यक्तींना बचाव, वैद्यकीय मदत, निवाऱ्याची सुविधा, सन्मानाची पुनर्स्थापना आणि कुटुंबीयांशी पुनर्मिलन कसे शक्य झाले, हे नोंदविण्यात आले आहे.

स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामची सुरुवात पौष्टिक अन्नाची नियमित उपलब्धता करून भुकेच्या समस्येला उत्तर देण्यासाठी करण्यात आली होती. कालांतराने हा उपक्रम अधिक सखोल काळजी आणि सहाय्याचा दुवा बनला आहे. दैनंदिन संपर्कामुळे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करता येतो, त्यांच्या आरोग्य आणि वर्तनातील बदल ओळखता येतात, अडचणींची जाणीव होते आणि त्यांना पुनर्वसन सेवांशी जोडता येते. या अहवालात कार्यक्रमाच्या मुख्य विश्वासाला अधिक बळ देण्यात आले आहे की, सातत्याने आणि मानवी संवेदनशीलतेने दिलेले एक जेवण मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते.

हा कार्यक्रम सध्या भारतातील 20 राज्यांमध्ये आणि सहा GCC देश, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि झांबिया यांसह नऊ देशांमध्ये कार्यरत आहे. मायक्रो लर्निंग सेंटर्स आणि स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम या दोन प्रमुख उपक्रमांद्वारे 1,43,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “एक जेवण साधे वाटू शकते, परंतु जेव्हा ते सातत्याने आणि मानवी संवेदनशीलतेने दिले जाते, तेव्हा ते फक्त अन्न राहत नाही. हंगर फ्री वर्ल्डच्या माध्यमातून आम्ही पाहिले आहे की नियमित संपर्क कसा विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वास पुनर्वसन, आरोग्यसेवांपर्यंत पोहोच, भावनिक आधार आणि सन्मान पुनर्स्थापनेचा पाया बनतो. या कथा असुरक्षित समुदायांशी सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित करतात, जिथे करुणा आणि सातत्य एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची दिशा अर्थपूर्णपणे बदलू शकते.”

स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामअंतर्गत अनेक उदाहरणांनी दाखवून दिले आहे की नियमित जेवणामुळे सखोल काळजी आणि सहाय्याचा मार्ग कसा खुला होऊ शकतो. नागरकोइल येथे बसस्थानका जवळ अन्न मिळवणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीने सुरक्षित आयुष्य जगण्याची इच्छा अन्न वितरण वाहन चालका समोर व्यक्त केली आणि त्यानंतर त्याला एका केअर होम मध्ये दाखल करण्यात आले. कुंभकोणम मध्ये, अनेक महिन्यांच्या नियमित अन्न सहाय्यामुळे खाटेवर खिळलेल्या व्यक्तीचा सन्मान स्वच्छता सेवा, स्वच्छ कपडे आणि पुनर्वसन सहाय्याद्वारे पुनर्स्थापित करण्यात आला. चेन्नई मध्ये, दिवसातून दोन वेळा होणाऱ्या सातत्यपूर्ण अन्न वितरण मोहिमेमुळे संकटात जीवन जगणाऱ्या एका महिलेला हळूहळू मदत स्वीकारण्यास आणि नंतर केअर सेंटरमध्ये स्थलांतरित होण्यास मदत झाली.

या कार्यक्रमामुळे उडुपी ते चेन्नई असा भावनिक कौटुंबिक पुनर्मिलनही शक्य झाला. नियमित अन्न वितरणादरम्यान झालेल्या संवादामुळे टीमला एका व्यक्तीची ओळख पटवता आली आणि त्याला त्याच्या पत्नी व मुलांशी पुन्हा जोडता आले. तिरुचिरापल्ली येथे नियमित अन्न वितरण मोहिमेदरम्यान एका शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय मदत, शस्त्रक्रियेनंतर पोषणविषयक काळजी आणि निवाऱ्याची सुविधा देण्यात आली. या अनुभवांमधून हे स्पष्ट होते की सातत्य आणि करुणेने दिलेले एक जेवण काळजी, सन्मान आणि अधिक सुरक्षित आयुष्याचा दुवा बनू शकते.

हा उपक्रम सामुदायिक कल्याण आणि सर्वसमावेशक विकासासाठी मलाबार ग्रुपच्या व्यापक CSR बांधिलकीचा भाग आहे. हंगर फ्री वर्ल्ड हा बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारतो, जो तातडीची भूक भागवण्याबरोबरच पोषण, पुनर्वसन, आरोग्य सहाय्य, निवारा, सन्मान पुनर्स्थापना आणि कुटुंबीयांशी पुनर्जोडणीद्वारे असुरक्षित व्यक्तींना आधार देतो.

मलाबार ग्रुप आपल्या निव्वळ व्यापार नफ्यापैकी पाच टक्के हिस्सा सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांसाठी देतो. भूक निर्मूलन, शिक्षण, आरोग्यसेवा, निवास, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या क्षेत्रांतील दीर्घकालीन कार्यक्रमांना या माध्यमातून पाठबळ दिले जाते.

हंगर फ्री वर्ल्ड आणि स्ट्रीट मील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामद्वारे मलाबार ग्रुप आणि थनल सातत्याने हे दाखवून देत आहेत की दैनंदिन जेवण हे काळजी, संरक्षण, पुनर्प्राप्ती आणि मानवी नातेसंबंधांकडे नेणारे पहिले पाऊल ठरू

शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments