Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिलखुलास’ 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात  विजय कोळेकर यांची विशेष मुलाखत

दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात  विजय कोळेकर यांची विशेष मुलाखत

 

 

मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर यांची हवामान अनुकूल तंत्रज्ञान व शाश्वत शेती व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून दि. ११ ते १६ जून २०२६ या कालावधीत सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. आणि ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर देखील मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. ११ जून २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरून प्रसारित करण्यात येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR⁠�

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR⁠�

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR⁠�

 

हवामान बदलामुळे शेती क्षेत्रासमोर निर्माण होत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हवामान अनुकूल तंत्रज्ञान, जलसंधारण, कमी मशागत, रुंद वखारावरील लागवड, हवामान अनुकूल बियाण्यांची निवड, बीजप्रक्रिया, डीएसआर (Direct Seeded Rice) पद्धती, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सुरक्षित फवारणी तंत्रज्ञान, काढणीपश्चात व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण तसेच डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचा शेतीमधील वापर आदी विषयांवर या मुलाखतीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘महाविस्तार एआय – शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र’ या उपक्रमाची माहिती, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळातील शेतीतील अपेक्षित बदल, युवकांसाठी उपलब्ध होत असलेल्या कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया याविषयीदेखील श्री. कोळेकर यांनी तपशीलवार माहिती

दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments