Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorized*कै.धनंजय थोरात मेमोरियल फाउंडेशन*  *आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा*  *येत्या...

*कै.धनंजय थोरात मेमोरियल फाउंडेशन*  *आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा*  *येत्या शनिवारी* 

 

 

पुणे : कै.धनंजय थोरात मेमोरियल फाउंडेशन च्या आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण येत्या शनिवारी दि.१३ जून रोजी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

हा कार्यक्रम पत्रकार भवन येथे सकाळी १०.३० वाजता होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य गुप्तचर खात्याचे निवृत्त अप्पर महासंचालक अशोक धिवरे उपस्थित रहाणार आहेत.

 

पारधी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत असणारे नामदेव भोसले यांनी आदिवासी आणि पारधी लोकांना घरकुले उपलब्ध करून दिली. तसेच सरकारी योजनांचा लाभ या लोकांना मिळावा म्हणून शासकीय कागदपत्र उपलब्ध करून दिली, हे कार्य त्यांनी अतिशय जिद्दीने केले., सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांचे’आयुष्यावर बोलू काही’ या सांगितिक कार्यक्रमाचे दोन हजारहून अधिक कार्यक्रम झाले असून, त्यांनी संगीत दिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत त्यांची संगीत सेवा तरुणाईला आकर्षित करणारी आहे., सर्व जातीधर्मात सलोखा रहावा यासाठी विविध उपक्रम राबविणारे, आषाढी वारीत सेवा करणारे मुश्ताक पटेल हे पुरस्काराचे मानकरी असून त्यांना समारंभात रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments