गुरुग्राम, 28 मे 2026 : मोरेपेन लॅबोरेटरीज लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY26) दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीचा निव्वळ नफा 69 टक्क्यांनी वाढून 20 कोटी रुपयांवर पोहोचला असून एकूण महसूल 22 टक्क्यांनी वाढून 472 कोटी रुपये झाला आहे. निर्यात व्यवसायातील वाढ आणि मेडिकल डिव्हाइसेस व्यवसायातील विस्तारामुळे ही वाढ साध्य झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या API (ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेडिएंट) व्यवसायात चौथ्या तिमाहीत 17 टक्के वाढ झाली, तर मेडिकल डिव्हाइसेस व्यवसायात 31 टक्क्यांची वाढ झाली. संपूर्ण आर्थिक वर्ष FY2025-26 मध्ये कंपनीचा स्टँडअलोन एकूण महसूल 1,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी अधिक आहे. संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2026 साठी भागधारकांना 10 टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे.


