डिसेंबर १९, २०२३: छोट्या व्यवसायांना डिजिटल कॉमर्सच्या शक्तीचा उपयोग करून घेण्यात मदत करण्याच्या उद्देशाने ओएनडीसी व मेटा यांनी आज भागीदारी केली. मेटाच्या व्यावसायिक व तांत्रिक सोल्युशन पुरवठादारांच्या परिसंस्थेमार्फत व्हॉट्सअॅपवर ग्राहक व विक्रेते यांच्यात अखंड संभाषणात्मक अनुभव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे. दरम्यान, ओएनडीसी या व्यावसायिक सोल्युशन पुरवठादारांना विक्रेता अॅप्ससारखे काम करण्यात मदत करेल, त्यामुळे ते ज्या व्यवसायांना सेवा देतात ते व्यवसाय ओएनडीसीच्या प्लॅटफॉर्मवर येतील आणि त्यांना व्यापार वाढवण्यास मदत केली जाईल.
भागीदारीला वेग देण्यासाठी पुढील पाच वर्षात पाच लाख एमएसएमईंची डिजिटल कौशल्ये मेटा बिझनेस अकॅडमीमार्फत अद्ययावत केली जातील. देशभरातील १ कोटी छोट्या व्यवसायांची कौशल्ये अद्ययावत करण्याच्या मेटाच्या वचनाचा भाग म्हणून स्थापन झालेली मेटा स्मॉल बिझनेस अकॅडमी उद्योजकांना व मार्केटिंग व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी एक प्रमाणपत्र देऊ करते. मेटा अॅप्सवर वाढीसाठी आवश्यक डिजिटल मार्केटिंग कौशल्ये या अभ्यासक्रमाद्वारे पुरवली जातात.
ओएनडीसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी टी कोशी म्हणाले, “ओएनडीसीमध्ये आम्ही डिजिटल क्षेत्राला वेग देण्यास आणि जास्तीत-जास्त घटकांना त्यात सामावून घेण्यास बांधील आहोत. त्या दिशेने जाण्याचा एक भाग म्हणून आम्ही एमएसएमईंना, डिजिटल दृश्यमानता निर्माण करण्यास व व्यवसायाला चालना देण्यास, सक्षम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आज कोणत्याही व्यवसायाला वाढ साध्य करण्यासाठी स्वत:चे मार्केटिंग करणे व विस्तृत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. मेटासोबत झालेल्या आमच्या सहयोगाच्या माध्यमातून, या व्यवसायांची डिजिटल कौशल्ये तर अद्ययावत केली जातीलच, शिवाय त्यांना दूरवरच्या व विस्तृत ग्राहकवर्गाशी जोडून घेण्याची क्षमताही पुरवली जाईल. आमच्या समन्वयात्मक प्रयत्नांमुळे लक्षावधी छोट्या व्यवसायांना वाढीसाठी योग्य ती चालना मिळेल आणि त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”
मेटाच्या भारतातील उपाध्यक्ष संध्या देवनाथन म्हणाल्या, “भारताच्या डिजिटल रूपांतरणाचा प्रवास क्रांतिकारी वेगाने सुरू आहे आणि ही वाढ अशीच राखण्यासाठी आपल्याला योग्य परिसंस्थेची तसेच लक्षावधी छोट्या व्यवसायांना त्यांचे डिजिटल अस्तित्व उभारण्याची व खोलवर नेण्याची क्षमता पुरवणाऱ्या सहयोगांची आवश्यकता आहे. डिजिटल समावेशनाची प्रक्रिया पुढे नेण्याच्या उद्देशाने सरकार व उद्योगक्षेत्र यांच्यासोबत सहयोग करण्यातही मेटा आघाडीवर आहे. विशेषत: भारतभरातील एमएसएमईंवर मेटा लक्ष केंद्रित करत आहे. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या (डीपीआय) सरकारने ठेवलेल्या उद्दिष्टाच्या पूर्ततेत हातभार लावण्यासाठी आम्ही ओएनडीसीशी भागीदारी केली आहे. तसेच छोट्या व्यवसायांना कौशल्य प्रशिक्षण देणे आणि या जलद डिजिटल रूपांतरणाला तसेच देशाच्या यशोगाथेला योगदान देणे ही उद्दिष्टेही या भागीदारीमागे आहेत.”
या सहयोगाचा भाग म्हणून मेटा ओएनडीसीच्या सहाय्यक या व्हॉट्सअॅप चॅटबोटला आवश्यक ती मदत पुरवणार आहे. त्यामुळे विक्रेता व ग्राहक यांच्यातील ओएनडीसीसाठीच्या संवादाचा एकमेव बिंदू असलेल्या या बोटद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मेटाने १ कोटी व्यापाऱ्यांची कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप से व्यापार’ हा उपक्रम सुरू केला. व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपद्वारे २९ राज्यांत ११ भारतीय भाषांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपचे जगभरात २०० दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत


