§ एएम/एनएस इंडियाने बिट्स पिलानी यांच्या सहकार्याने राबविलेल्या कामाशी एकात्मिक शिक्षण उपक्रमामुळे भविष्यासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेला बळ मिळाले असून, क्षमता विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
§ पदवीधरांनी शैक्षणिक ज्ञानाचा प्रत्यक्ष कामकाजातील आव्हानांवर प्रभावीपणे उपयोग करून वास्तव परिणाम घडवून आणले आहेत. यामुळे विविध प्रमुख विभागांतील कार्यक्षमता वाढण्यास आणि कामकाज अधिक परिणामकारक होण्यास मदत झाली आहे.
हजीरा–सुरत, गुजरात, 11 जून 2026: जगातील आघाडीच्या दोन पोलाद उत्पादक कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एएम/एनएस इंडिया ने बिट्स पिलानीसोबतच्या आपल्या धोरणात्मक भागीदारीद्वारे कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धीबाबतची बांधिलकी अधिक दृढ केली आहे. प्रोसेस इंजिनिअरिंगमधील बी.टेक. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, एएम/एनएस इंडियाने मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील पहिल्या एमबीए बॅचच्या पदवीदानासह आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
दीक्षांत समारंभ गुरुवारी एएम/एनएस इंडियाच्या हजीरा येथील प्रमुख प्रकल्पात आयोजित करण्यात आला. या समारंभाला सुरतचे पोलीस आयुक्त, आयपीएस अधिकारी अनुपम सिंह गहलोत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोलाद क्षेत्रात कार्य-अभ्यास एकात्मिक शिक्षण स्वीकारण्यात आघाडीवर असलेल्या एएम/एनएस इंडियाने भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ विकसित करण्यासाठी वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स (डब्लूआयएलपी) चा प्रभावीपणे वापर केला आहे. बी.टेक. कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी आणि विस्तार केल्यानंतर, विविध विभागांतील नेतृत्व क्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रम सुरू केला. सध्या या कार्यक्रमाच्या अनेक बॅचेस सुरू असून, कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सातत्यपूर्ण शिक्षणाबाबत संस्थेची दृढ बांधिलकी याचे ते प्रतीक आहे.
पारंपरिक एमबीए कार्यक्रमांपेक्षा वेगळा असलेला बिट्स पिलानीचा एएम/एनएस इंडिया साठीचा अभ्यासक्रम आधुनिक पोलाद उत्पादन क्षेत्रातील गुंतागुंतीच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आला होता. या कठोर आणि सर्वसमावेशक कार्यक्रमामध्ये पुरवठा साखळीचे अनुकूलन, धोरणात्मक वित्त व्यवस्थापन आणि संस्थात्मक नेतृत्व यांसारख्या व्यवस्थापनाच्या मूलभूत तत्त्वांसह डिजिटल परिवर्तन, शाश्वत उत्पादन पद्धती आणि माहिती-आधारित निर्णयप्रक्रिया यांसारख्या विशेष अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमामुळे सहभागी कर्मचाऱ्यांना शैक्षणिक ज्ञानाचा त्यांच्या एएम/एनएस इंडियामधील सुरू असलेल्या कामकाजाशी प्रभावीपणे समन्वय साधता आला. कार्यक्रमाच्या लवचिक बहुआयामी (मल्टी-मोडल) अध्यापन पद्धतीचा लाभ घेत कर्मचाऱ्यांनी महत्त्वाच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडतच आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. यामुळे संस्थेतील सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उत्कृष्ट कामगिरीची मजबूत संस्कृती अधिक दृढ झाली.
स्टीलमेकिंग आणि डिजिटल टेक्नॉलॉजीसारख्या महत्त्वाच्या विभागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या पदवीधर बॅचने आधीच व्यवसायावर मोजता येण्याजोगा सकारात्मक परिणाम घडवून आणला आहे. त्यांच्या कॅपस्टोन प्रकल्पांद्वारे सहभागी कर्मचाऱ्यांनी कार्यप्रणालीतील अडथळ्यांवर उपाय शोधले, कार्यक्षमतेत वाढ केली आणि संपूर्ण संस्थेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा उपक्रमांना महत्त्वपूर्ण योगदान दिले.
सुरतचे पोलीस आयुक्त, आयपीएस अधिकारी अनुपम सिंह गहलोत म्हणाले, “या महत्त्वपूर्ण यशाबद्दल मी सर्व पदवीधर व्यावसायिकांचे अभिनंदन करतो. व्यावसायिक जबाबदाऱ्यांचा मोठा भार सांभाळत शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करणे हे त्यांच्या शिस्तबद्धतेचे आणि दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. सर्व पदवीधरांनी उत्कृष्टतेचा ध्यास कायम ठेवावा, आपल्या संस्था आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान द्यावे तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यात आपली सक्रिय भूमिका बजवावी, असे मी आवाहन करतो.”
आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) चे संचालक आणि उपाध्यक्ष (मानव संसाधन व प्रशासन) आशुतोष तेलंग म्हणाले, “एएम/एनएस इंडियामध्ये सातत्यपूर्ण शिक्षण हा क्षमता विकास आणि उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचा केंद्रबिंदू आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा अशा नेतृत्वकर्त्यांची जडणघडण करण्याबाबतची आमची बांधिलकी दर्शवितो, जे व्यावसायिक दृष्टीकोनाला तांत्रिक आणि कार्यात्मक उत्कृष्टतेशी प्रभावीपणे जोडू शकतात. बिट्स पिलानीसोबतच्या सहकार्याद्वारे आम्ही भविष्यासाठी सज्ज असलेली प्रतिभावान मनुष्यबळ साखळी अधिक मजबूत करत आहोत. ही साखळी नवकल्पनांना गती देईल आणि भारतात जागतिक दर्जाचा पोलाद उद्योग उभारण्याच्या आमच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देईल.”
बिट्स पिलानीचे ऑफ-कॅम्पस प्रोग्राम्स आणि इंडस्ट्री एंगेजमेंट विभागाचे उपसंचालक प्रा. एस. गुरुनारायणन म्हणाले, “बिट्स पिलानी डब्ल्यूआयएलपीमध्ये आमचे शैक्षणिक तत्त्वज्ञान हे उद्योगांच्या बदलत्या बौद्धिक गरजांनुसार विशेष अभ्यासक्रम संयुक्तपणे विकसित करण्यावर आधारित आहे. एएम/एनएस इंडियासोबतची आमची भागीदारी ही कार्य-अभ्यास एकात्मिक शिक्षणाची खरी भावना दर्शवते, ज्यामध्ये शैक्षणिक उत्कृष्टता आणि उद्योगातील सर्वोत्तम कार्यपद्धती यांचा संगम साधला जातो. आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक वातावरणात नेतृत्वासाठी केवळ पारंपरिक व्यवस्थापन कौशल्ये पुरेशी नसून तांत्रिक प्रगती आणि शाश्वत विकास यांची सखोल जाण असणेही आवश्यक आहे. या एमबीए पदवीधरांची पिढी एएम/एनएस इंडियाच्या धोरणात्मक आणि कार्यात्मक यशाला गती देण्यात निश्चितच महत्त्वपूर्ण
भूमिका बजावेल.”


