Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाश्वत भविष्यासाठी ‘हरित शपथ’ अभियान वैयक्तिक...

शाश्वत भविष्यासाठी ‘हरित शपथ’ अभियान वैयक्तिक व सामूहिक हरित उपक्रमांना मिळणार गुणांकन

पिंपरी, दि. १२ जून २०२६ : वसुंधरेचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत ‘हरित शपथ’ या ई-प्रतिज्ञा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

 

या माध्यमातून नागरिकांनी पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून वसुंधरा संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

 

 

 

उपक्रमांतर्गत नागरिकांना माझी वसुंधरेच्या

 

https://majhivasundhara.in/en/pledge/MQ%3D%3D या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक अथवा सामूहिक स्वरूपात हरित शपथ घेता येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या ई-प्रतिज्ञा आणि त्यानुसार राबविण्यात आलेल्या कृतींच्या आधारे सहभागी व्यक्ती व गटांचे गुणांकन करण्यात येणार आहे.

 

 

 

वृक्षसंवर्धन, जलस्रोतांचे जतन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा बचत आणि स्वच्छता यांसारख्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नमूद केले.

 

 

 

हरित शपथ ही केवळ प्रतिज्ञा नसून वसुंधरा संवर्धनासाठीची सामूहिक बांधिलकी आहे. या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाधिक नागरिकांनी वसुंधरा रक्षणाच्या चळवळीत योगदान द्यावे, असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले.

 

…..

 

 

 

कोट:

 

वसुंधरा संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक बांधिलकी आहे. ‘हरित शपथ’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याचा आणि शाश्वत विकासाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन वृक्षसंवर्धन, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन आणि ऊर्जा बचत यांसारख्या हरित कृतींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीतून शपथ घ्यावी.

 

 

 

-रवि लांडगे, महापौर,

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments