Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड*

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड*

 

 

पुणे, दि. १२ जून – संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद टांकसाळे (उपनिबंधक, पुणे शहर १) यांनी कामकाज पाहिले. यावेळी सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे उपस्थित होते. ते म्हणाले की, युद्धजन्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थविश्वासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पतसंस्थांसमोर देखील नवीन आव्हाने उभी राहत आहेत, अशा परिस्थितीत राज्यभरातील सुमारे १९ हजार पतसंस्थांना सक्षम नेतृत्व मिळाले आहे. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक संचालक वसंत शिंदे, माजी अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल सिंगी, महासचिव शशिकांत राजोबा आणि सर्व संचालक सदस्य उपस्थित होते.

राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲड. पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार किरण सामंत, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व आमदार प्रवीण दरेकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, आमदार प्रसाद लाड आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments