Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते ह.भ.प. परेश बुवा देवळणकर : प्रथमच मराठीत...

गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते ह.भ.प. परेश बुवा देवळणकर : प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन

 

 

पुणे : आपले सर्व ज्ञान मुळात वेदांमधून आले आहे. वेद ऋषींना दृष्ट झाले आणि त्यांनी पुढे ते समाजाला शिकवले. वेद समजणे अत्यंत अवघड असून, त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. वेदांचे पठण आणि वेदांचे आकलन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पुराणांचे सार परोपकार आणि पुण्यप्राप्ती हे आहे. अठरा पुराणे आणि चार वेद यांमध्ये अनेक विषयांचा ऊहापोह करण्यात आला असला, तरी सर्व पुराणांमध्ये एक समान धागा आढळतो. तो म्हणजे गोमातेचे महत्त्व. प्रत्येक पुराणात गोमातेचा उल्लेख असून, गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. परेश बुवा देवळणकर यांनी केले.

 

ग्रंथ पारायण दिंडी, पुणे आणि गीताधर्म मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळ येथे करण्यात आले आहे. या गोकथेचे निरूपण ह.भ.प. परेश बुवा देवळणकर करत आहेत. कथेच्या पहिल्या दिवशी कपिला गायीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे, गीताधर्म मंडळ अध्यश्र प्राचार्य डॉ.मुकुंद दातार, वे.मु.ओमकार सप्रे आदी उपस्थित होते. गोशाळांचे व्यवस्थापन व गोसेवेचे कार्य निष्ठेने चालविणाऱ्या गोशाळा संचालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध गोशाळांना आर्थिक मदत व देणग्यांचे वितरण करण्यात आले.

 

परेश बुवा देवळणकर म्हणाले, ब्रह्मपुराणात गोमातेमध्ये सर्व देवतांचा वास असल्याचे वर्णन असून, ती पवित्र आहे व सर्व पापांचा नाश करणारी असल्याचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात सर्व तीर्थांचे स्वरूप गोमातेमध्ये असल्याचे सांगून प्रयत्नपूर्वक गाईची सेवा करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. विष्णुपुराणातही गोमातेचे महत्त्व वर्णन करण्यात आले असून, शिवपुराणात गोहत्येला ब्रह्महत्येसमान महापाप मानले आहे. गाईची सेवा हे परम पुण्य असून तोच खरा धर्म असल्याचे विविध पुराणांमध्ये सांगितले आहे. तसेच मार्कंडेय पुराणात धर्म टिकवायचा असेल, तर गाईंचे रक्षण करा, असा संदेश देण्यात आला आहे.

 

वे.मु.ओमकार सप्रे म्हणाले, निष्काम कर्माचे फळ भगवान त्यांच्या इच्छेनुसार देतात. कर्म करताना ते निष्काम भावनेने केले पाहिजे. अशा निष्काम कर्मामुळे इहलोकात आणि परलोकातही कल्याण होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments