Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedलेले हितवर्धक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आणि कुल संमेलन*

लेले हितवर्धक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आणि कुल संमेलन*

*लेले हितवर्धक मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आणि कुल संमेलन* शनिवार
दिनांक 16 मार्च रोजी गोवर्धन मंगल कार्यालय, शनिवार पेठ, पुणे येथे संपन्न झाले. सभेचे अध्यक्षस्थान श्री रामचंद्र दत्तात्रय लेले यांनी भूषविले. त्यावेळेस कार्याध्यक्ष
भास्कर वामन लेले, कार्यवाह श्रीकांत वसंत लेले व
सह कोषाध्यक्ष आनंंद दत्तात्रय लेले त‌सेच कार्यकारी मंडळासह लेले परिवार उपस्थित होता. सकाळी नावनोंदणी व न्याहरी झाल्यावर सभेपूर्वी
दिप प्रज्वलना नंतर श्रीमती शर्वरी उमेश लेले
यांनी ईशस्तवन सादर केले. सदर सभेत कार्याध्यक्ष भास्कर वामन लेले
यांनी lelekul.in या नवीन संकेतस्थळा
संबंधित माहिती दिली. आज रोजी दिवंगत आणि हयात अशा लेले कुलनामधारकांची संख्या ११३०० च्या जवळपास आहे. दुपारी सुग्रास जेवणाचा आस्वाद सर्व बांधवानी घेतला.
त्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपला परिचय
करुन दिला. शेवटी चहा पाना नंतर कार्याध्यक्ष भास्कर वामन लेले यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले. सर्व कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कार्यवाह श्रीकांत वसंत लेले यानी केले. खेळी मेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments