पुणे, जून १६, २०२६: कोका-कोलाने आज ‘मॅचडे हँगआउट’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा भारतातील फुटबॉल चाहत्यांच्या वाढत्या पिढीसाठी तयार करण्यात आलेला प्रसिद्ध क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील लाईव्ह फुटबॉल वॉचअलॉंग (थेट सामना पाहण्याचा) अनुभव आहे.
फिफा वर्ल्ड कप सीझनदरम्यान सुरू करण्यात आलेला कोका-कोला मॅचडे हँगआउट रात्री उशिरापर्यंत फुटबॉल पाहण्याच्या पद्धतीला सामायिक अनुभवात बदलतो. याद्वारे १२ राष्ट्रीय प्रवाहांच्या माध्यमातून चाहत्यांना रिअल टाइममध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी, प्रत्येक मोठ्या क्षणावर चर्चा करण्यासाठी आणि क्रिएटर्ससह सामन्याचा आनंद घेण्यासाठी व्हर्च्युअली एकत्र आणले जाते, ज्यामधून आजच्या सोशल मीडियाच्या वातावरणात भारतातील फुटबॉल प्रेमींची फुटबॉल सामना पाहण्याची पद्धती निदर्शनास येते.
फिफासोबत कोका-कोलाचा दीर्घकाळापासून असलेला सहयोग नेहमी फुटबॉलमुळे निर्माण होणारी आवड आणि एकजूट साजरी करण्यावर आधारित राहिला आहे. कोका-कोला मॅचडे हँगआउटच्या माध्यमातून तीच भावना नव्या युगातील, क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील डिजिटल स्वरूपात जिवंत होते. या अनुभवाची निर्मिती आणि सूत्रसंचालन भारतातील आघाडीचे स्वतंत्र संपादकीय क्रीडा व्यासपीठ रेव्हस्पोर्ट्सद्वारे केले जात आहे, जे या शोचे थेट प्रक्षेपण आणि कथाकथन अखंडपणे हाताळेल. या क्रीडा-मनोरंजन शोचे नेतृत्व क्रिएटर्स रोहन जोशी, साक्षी शिवदासानी आणि काशवी हिरानंदानी करतील, तर काही निवडक सामन्यांच्या दिवसांमध्ये जेरवान बुंशाह, वरुण ठाकूर आणि फुटबॉलपटू दलिमा छिब्बर यांचाही सहभाग असेल.
या उपक्रमाच्या शुभारंभाबाबत मत व्यक्त करत कोका-कोला टीएम इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे मार्केटिंगचे सीनियर डायरेक्टर कार्तिक सुब्रमण्यम म्हणाले, “फिफासोबत आमच्या दीर्घकाळापासून सहयोगाच्या माध्यमातून कोका-कोला अनेक दशकांपासून फुटबॉल चाहत्यांच्या विश्वाचा अविभाज्य भाग राहिला आहे. रात्री उशिरापर्यंत सामना पाहण्याचा घेतला जाणारा आनंद केवळ काही पद्धती, प्रतिक्रिया आणि सामायिक भावनांबद्दल असतो. कोका-कोला मॅचडे हँगआउट सोशल मीडियाच्या अनुभवांद्वारे ते नाते अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. समुदायाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन ठेवून आम्ही क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील अनुभवाची रचना केली आहे आणि रेव्हस्पोर्ट्ससोबत सहयोग आम्हाला हे संवादात्मक स्वरूप थेट प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोहोचवण्यास मदत करतो.”
रेव्हस्पोर्ट्सचे संस्थापक आणि सीईओ बोरिया मुजुमदार म्हणाले, “फुटबॉल नेहमी भावना, संवाद आणि समुदायाशी संबंधित राहिले आहे. कोका-कोला मॅचडे हँगआउटच्या माध्यमातून आम्ही रात्री उशिरा पाहिल्या जाणाऱ्या सामन्यांदरम्यान होणारे संवाद देशभरातील चाहत्यांसाठी सामायिक अनुभवात बदलत आहोत. रेव्हस्पोर्ट्समध्ये आमचा चाहत्यांना खेळाशी जोडण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग तयार करण्यावर नेहमी विश्वास राहिला आहे आणि कोका-कोलासोबत हा सहयोग आम्हाला खेळ, मनोरंजन व डिजिटल संस्कृतीला अशा सोशल फॉरमॅटमध्ये एकत्र आणण्याची संधी देते, जे आजचे प्रेक्षक थेट कार्यक्रम ज्या प्रकारे पाहतात त्याच्याशी अगदी सुसंगत आहे. चाहत्यांसाठी सर्वोत्तम गंतव्य तयार करताना आम्हाला आनंद होत आहे, जिथे ते फिफा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठ्या क्षणांचा एकत्र आनंद घेऊ शकतात, त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतात, चर्चा करू शकतात आणि आनंद साजरा करू शकतात.”
चाहते सामन्याच्या वेळेत झेप्टो आणि ब्लिंकिटवरून कोका-कोला ऑर्डर करून या संवादी वॉचअलॉंग स्ट्रीम्सचा आनंद घेऊ शकतात. प्रत्येक खरेदीमुळे चाहत्यांना लाईव्ह स्पेसमध्ये (थेट प्रक्षेपणात) प्रवेश करण्याची संधी मिळेल, जिथे सामन्यापूर्वीचे अंदाज, खेळावरील थेट प्रतिक्रिया, हाफटाइमनतर चर्चा, सामन्यानंतरचे वादविवाद, प्रश्नमंजुषा), आकर्षक भेटवस्तू आणि प्रसिद्ध क्रिएटर्सनी दिलेली आव्हाने अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेता येईल.
कोका-कोला मॅचडे हँगआउटच्या प्रत्येक स्ट्रीमचा प्रवेश अत्यंत विशेष (एक्स्क्लुझिव्ह) असेल, ज्यामुळे सामन्याची प्रत्येक रात्र ही कधीही न गमावावी अशी ठरेल. याशिवाय, सहभागी होणाऱ्यांना कोका-कोलाचे विशेष मर्चेंडाइज, जसे मिनी फ्रिज, कॅप्स), टी-शर्ट्स आणि सिपर्स जिंकण्याची सुवर्णसंधी देखील मिळणार आहे.
कोका-कोला मॅचडे हँगआउटच्या माध्यमातून कोका-कोलाने चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाच्या आणखी जवळ आणण्यासाठी आणि कधीही विसरता येणार नाही असे क्षण देण्यासाठी उत्सुकता, संस्कृती व आपुलकीचे नाते सांगणारे सोशल आणि क्रिएटर्सच्या नेतृत्वाखालील अनोखे अनुभव सातत्याने निर्माण करण्याची आपली कटिबद्धता का
यम ठेवली आहे.


