Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा...

समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ*

 

 

पुणे, दि.१७ : समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे आणि प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नशामुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नशामुक्त अभियानाची शपथ घेण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणामाबाबत माहिती देण्यात आली. सदर उद्घाटन सफाई कामगार मुलींची शाळा येरवडा या ठिकाणी करण्यात आले. यावेळी होप फाउंडेशनचे डॉ.मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. राधाकिसन देवढे,

सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सागर सोनवणे आदी उपस्थित होते.

 

 

*नशामुक्त भारत अभियान व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धा-२०२६-२७*

 

सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित नशामुक्ती पोस्टर स्पर्धा पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड बॉईज, कोरेगाव पार्क पुणे येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील दहा दिव्यांग शाळेतील सुमारे ९० विद्यार्थी आणि कला शिक्षक उपस्थित होते.

 

*प्रख्यात चित्रकार श्री. सबनीस यांनी पोस्टर स्पर्धेचे परीक्षण करुन गुणांकन केले. स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे*

 

१)प्रथम क्रमांक :हुसेन सय्यद

आधार मूकबधिर विद्यालय बिबेवाडी

२) द्वितीय क्रमांक: महाबुबी शाबादी

चिंचवड बधीर मुक विद्यालय निगडी .

३) तृतीय क्रमांक: शुभम अंबाजी जाधव, बधिर मूक शिक्षण केंद्र पुणे

–विभागून-

३) तृतीय क्रमांक -समृद्धी वैजनाथ मिसाळ, चिंचवड बधीर मूक विद्यालय निगडी पुणे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments