Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय नौदलात अग्निवीर (अप्रेंटिस) भरती; अर्जाची अंतिम मुदत २९ जून*

भारतीय नौदलात अग्निवीर (अप्रेंटिस) भरती; अर्जाची अंतिम मुदत २९ जून*

 

 

पुणे, दि. १८ : भारतीय नौदलाच्या अग्निवीर (अप्रेंटिस) ०१/२०२७ व ०२/२०२७ बॅचसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ जून २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून २०२६ आहे.

 

या भरतीसाठी उमेदवारांनी किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे तसेच ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेतून संबंधित अभ्यासक्रमातील तीन वर्षांचा डिप्लोमा किमान ५० टक्के गुणांसह पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

 

पात्र अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून अर्ज व अधिक माहितीसाठी www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर पुणे यांनी केले आहे.

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments