Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबायोफाउंड बायोटेक ठरले बिझकोशंट २०२४ स्पर्धेतील पुण्यातील अंतिम फेरीचे विजेता

बायोफाउंड बायोटेक ठरले बिझकोशंट २०२४ स्पर्धेतील पुण्यातील अंतिम फेरीचे विजेता

पुणे,१९ मार्च २०२४ : टीआयई पुणे येथे टीआयई यु (युनिव्हर्सिटी) टीम तर्फे आयोजित बिझकोशंट स्पर्धेच्या पुणे अंतिम फेरीचे विजेतेपद बायोफाउंड बायोटेक ने पटकावले. बिझकोशंट ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली बिझनेस प्लॅन स्पर्धा आहे.या अंतिम फेरीसाठी १०६ प्रवेशिकांमधून ५ विद्यार्थी संघ निवडण्यात आले. जगभरातील सर्व टीआयई चॅप्टर्ससाठी ही बिझनेस प्लॅन स्पर्धा आयोजित केली जाते. विजेती टीम आता १ मे दरम्यान सिलिकॉन व्हॅली येथे होणार्‍या जागतिक अंतिम फेरीत भाग घेणार आहे.

अर्श चव्हाण आणि आदित्य जोशी हे बायोफाउंड बायोटेकचे सहसंस्थापक आहेत.या विद्यार्थ्यांनी सोबत काम केले असून एक एन्झाइम विकसित केले आहे,जे मळीचे (मोलॅसेस) इथेनॉलमध्ये अधिक चांगले रूपांतर करण्यास मदत करते. टीआयई पुणे तर्फे बायोफाउंड बायोटेकला रु.1,00,000/- चे रोख पारितोषिक देण्यात आले.

आकाशदीप बन्सल यांनी स्थापित केलेल्या सरलएक्स ला पहिले उपविजेतेपद मिळाले. दिव्यांग लोकांसाठी डिजिटल सुविधा सुलभ उपलब्ध होऊ शकतील हा सरलएक्स चा प्रयत्न आहे . आकाशदीप बन्सल यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. दुसरे उपविजेतेपद आदित्य गौरव यांनी स्थापित केलेल्या कोन्याक मेटावर्स ने पटकावले. कोन्याक मेटावर्स ने अधिक वास्तववादी मेटाव्हर्स तयार करण्याची योजना आखली आहे. यांना २५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

विद्यार्थी समुदायामध्ये उद्योजकतेला चालना देण्याच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून, टीआयई ने दोन वर्षांपूर्वी (पुणे येथे) बिझकोशंट ही बिझनेस प्लॅन स्पर्धा सुरू केली.टीआयई यु पुणे चे अध्यक्ष विनीत देव म्हणाले की, आमचा उद्देश विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे,जेणे करून ते उद्योजक म्हणून रोजगार निर्माण करू शकतील. उपांत्य फेरीसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना स्वत: यशस्वी उद्योजक असलेले टीआयई पुणेचे चार्टर सदस्यांनी विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी आणि आपल्या संकल्पना सादर करण्यासाठी मार्गदर्शन केले. जेणेकरून त्यांना त्यांची कल्पना कशी पहावी, ती कशी प्रमाणित करावी, व्यवसाय योजना कशी लिहावी, या गोष्टी समजू शकतील. आशा आहे की ते महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थी आपल्या व्यवसाय संकल्पनांवर काम करत राहतील.

टीआयई पुणे तर्फे विविध श्रेणीमध्ये बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये सोशल इम्पॅक्ट साठी सर्वोत्कृष्ट स्टुडंट स्टार्टअप – सरल एक्स, ओरल पिचसाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी स्टार्ट-अप – ऍग्रोएम, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी स्टार्ट-अप आयडिया – बायोफाऊंड बायोटेक, सादरीकरणासाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी स्टार्ट-अप -रिका आणि टीमवर्कसाठी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी स्टार्ट-अप – सायबर चक्र यांचा समावेश होता. या श्रेणीतील पुरस्कारांव्यतिरिक्त सायबर चक्र आणि राफ्टेक सोल्युशन्स यांना अंतिम फेरीतील प्रमाणपत्र देण्यात आले

अंतीम फेरीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिफेन्स इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष शिरीष देशमुख उपस्थित होते.

या पाच उपांत्य फेरीतील स्पर्धकांचे परीक्षक म्हणून फोरसाइट आयएनएडीचे संस्थापक व टीआयई पुणेचे चार्टर सदस्य अनिल ताबीब, बायोजेनिक्स लॅबचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन रावल आणि एव्हरस्ट्रीम ॲनालिटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक व योरनेस्ट व्हीसीचे भागीदार रणजीत शेट्ये या यशस्वी उद्योजकांनी काम पहिले. याप्रसंगी बोलताना अनिल ताबीब म्हणाले की, खरे सांगायचे तर या पाच पैकी निवड करणे खूप कठीण काम होते. परंतु मला असे वाटते की प्रत्येक स्टार्ट अप संस्थापकाने हे समजून घेतले पाहिजे की तुमची कल्पना काय आहे, तुम्ही ज्या समस्येचे निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहात त्या समस्येसाठी ते कसे कार्य करेल हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटे दिली जातात.तुमची कल्पना कितीही अनोखी असली तरी जगाचा किंवा बाजारपेठेचा तुमच्या कल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. त्यामुळे तुमची कल्पना एका सोप्या भाषेत समजून सांगणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन व कार्यान्वयन टीआयई यु,पुणे टीम तर्फे करण्यात आले होते. ज्याचे अध्यक्ष म्हणून पॉझिव्ह्यू कन्सल्टिंग चे संस्थापक विनित देव आणि सह-अध्यक्ष म्हणून युनिटी आय इ अँड ऍडिशनल व्हेंचर्सच्या संस्थापक डॉ. अनघा पाठक आणि इव्यास लर्निंग च्या संस्थापक डॉ. प्रतिमा शेवरे यांनी काम पाहिले. याबरोबरच प्रिक्झाम अँड माय क्लास ऍडमिनच्या संस्थापक पायल दोशी, एससीआयईचे प्रमुख योगेश ब्राम्हणकर आणि फ्लेम युनिव्हर्सिटी चे सहयोगी प्राध्यापक डॉ. अमरप्रीत घुरा यांसारख्या सहयोगी सदस्यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments