Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यातील द बिशप्स स्कूल बनले ऑफिशियल F1® सिम रेसिंग इंडिया ओपन प्रोग्रामचे...

पुण्यातील द बिशप्स स्कूल बनले ऑफिशियल F1® सिम रेसिंग इंडिया ओपन प्रोग्रामचे पहिले फ्लॅगशिप पार्टनर स्कूल

या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना सिम्युलेटर-आधारित रेसिंग शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील

 

 

 

 

 

पुणे, १८ जून २०२६: मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडने (एमएफआरएल) आज ऑफिशियल F1® सिम रेसिंग इंडिया ओपन प्रोग्राम अंतर्गत पुण्यातील द बिशप्स स्कूलला पहिले फ्लॅगशिप पार्टनर स्कूल म्हणून जाहीर केले आहे. हा उपक्रम विशेषतः शाळांवर केंद्रित आहे. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांना सिम रेसिंगच्या जगाची ओळख करून देणे आणि सुरुवातीच्या टप्प्यावरच उदयोन्मुख मोटरस्पोर्ट प्रतिभेचा शोध घेणे हे उद्दिष्ट आहे.

 

 

 

या उपक्रमांतर्गत, भागीदार शाळांना सिम्युलेटर पायाभूत सुविधा, प्रशिक्षण साहाय्य आणि स्ट्रक्चर्ड लर्निंग मॉड्यूल्स (संरचित शिक्षण मॉड्यूल्स) पुरवले जातील, जे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक सिम रेसिंगची ओळख करून देण्यास आणि रेसिंग क्षेत्रातील नवीन प्रतिभा शोधण्यास मदत करतील. १८६४ मध्ये स्थापन झालेल्या द बिशप्स स्कूलची निवड एमएफआरएलने त्यांच्या शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट परंपरेसाठी केली आहे, ज्यामध्ये २००८ मध्ये मिळालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्स पुणे अवॉर्डचाही समावेश आहे.

 

 

 

भारतातील मोटरस्पोर्ट आणि ऑटोमोटिव्ह नवनिर्मितीशी असलेल्या घनिष्ठ संबंधामुळे फ्लॅगशिप पार्टनर स्कूल प्रोग्रामची सुरुवात करण्यासाठी पुणे हे एक आदर्श ठिकाण आहे. या शहराने पिढ्यानपिढ्या रेसिंग उत्साही आणि स्पर्धक दिले आहेत. येथील प्रस्थापित मोटरस्पोर्ट पायाभूत सुविधा, विशेष अभियांत्रिकी संस्कृती आणि सक्रिय ग्रासरूट कम्युनिटी यांमुळे हे शहर स्ट्रक्चर्ड सिम रेसिंग प्रोग्राम्‍स सुरू करण्यासाठी आणि उच्च स्तरावर मोटरस्पोर्टमध्ये करिअर करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी एक आदर्श वातावरण पुरवते.

 

 

 

या इव्‍हेण्‍टप्रसंगी आपले मत व्‍यक्त करत मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित गाढोके म्हणाले, “F1® सिम रेसिंग प्रोग्राम भारतात आणण्यामागचा एक उद्देश मोटरस्पोर्टला देशभरातील तरुण पिढीसाठी अधिक सुलभ बनवणे हा आहे. शाळा या प्रयत्नाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, कारण त्या आम्हाला विद्यार्थी आणि पालकांशी सुरुवातीच्या टप्प्यावरच संवाद साधण्याची आणि त्यांना कौशल्य, एकाग्रता, तंत्रज्ञान आणि स्पर्धा यांचा संगम असलेल्या या शिस्तीची ओळख करून देण्याची संधी देतात. द बिशप्स स्कूलचे पहिले फ्लॅगशिप पार्टनर स्कूल म्हणून स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे आणि मोटरस्पोर्टमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्सुकता आणि संधी निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

 

 

 

द बिशप्स स्कूलचे मुख्याध्यापक [XX] म्हणाले, “द बिशप्स स्कूलमध्ये, आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांना पारंपरिक वर्गाच्या पलीकडच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आणि त्यांना आवडीच्या उदयोन्मुख क्षेत्रांचा शोध घेण्यास प्रोत्साहित करण्यावर विश्वास ठेवला आहे. ही भागीदारी आमच्या विद्यार्थ्यांना एका संरचित आणि शैक्षणिक स्वरूपाद्वारे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त खेळाशी परिचित करून देते. मुंबई फाल्कन्स रेसिंग लिमिटेडकडे तरुण टॅलेंट विकसित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय मोटरस्पोर्टच्या सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्याचा मोठा अनुभव आहे, ज्यामुळे ते आमचे एक आदर्श भागीदार ठरले आहेत. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, स्पर्धा आणि

 

 

 

वैयक्तिक वाढीच्या नवीन मार्गांकडे नेण्यास उत्सुक आहोत.”

 

या प्रोग्राममध्‍ये सामील होणारी पहिली शाळा म्हणून द बिशप्स स्कूल शाळेच्या आवारात सिम रेसिंगचे वातावरण निर्माण करण्यासाठी एमएफआरएलसोबत काम करेल. तसेच, व्यापक F1® इंडिया प्रोग्रामशी संबंधित प्रशिक्षण आणि सहभागाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देईल. शाळांशी भागीदारी करून एमएफआरएलचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुलभ आणि शैक्षणिक वातावरणात या खेळाशी परिचित करणे, तसेच मोटरस्पोर्टमधील

 

 

 

उदयोन्मुख संधींविषयी जागरूकता निर्माण करणे हे आहे.

 

F1® सिम रेसिंग इंडिया ओपन २०२६ भारतातील १० शहरांमध्ये आयोजित केली जाईल. यामध्ये सहभागी स्पर्धक फॉर्म्युला वन सर्किट्सवर प्रोफेशनल-ग्रेड सिम्युलेटर्सवर स्पर्धा करतील. ऑनलाईन पात्रता फेरी सध्या सुरू आहेत आणि त्यानंतर शहर-आधारित सिम्युलेटर फेऱ्या होतील. या स्पर्धेची सांगता नोव्हेंबर २०२६ मध्ये मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीने हो

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments