एआय-आधारित तंत्रज्ञान, महामार्गांची पायाभूत सुविधा, चालक सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या माध्यमातून देशातील महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन उपक्रमाला बळकटी
नवी दिल्ली, २ जून २०२६: एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित फ्लीट सुरक्षा आणि परफॉर्मन्स तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी नेत्राडाइन ने भारताच्या नॅशनल हायवेज फॉर इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एनएचईव्ही) उपक्रमात विकसित होत असलेल्या इलेक्ट्रॉनिक हायवे नेटवर्कसाठी इंटेलिजन्स आणि सुरक्षा प्रणाली उपलब्ध करून देणार असल्याची आज घोषणा केली. या उपक्रमाअंतर्गत एनएचईव्हीच्या एकात्मिक ई-हायवे पायाभूत सुविधांमध्ये अत्याधुनिक ‘इंटेलिजन्स लेयर’ जोडला जाईल, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक वाहतुकीला अधिक सुरक्षित, परस्पर जोडलेली आणि विश्वासार्ह बनविण्यास मदत होईल.
या उपक्रमांतर्गत नेत्राडाइनची एआय-सक्षम सोल्युशन्स प्रणाली एनएचईव्ही समर्थित कॉरिडॉरवर धावणाऱ्या व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये टप्प्याटप्प्याने बसविण्यात येईल. यामुळे रिअल-टाइम फ्लीट निरीक्षण, संभाव्य जोखमींची पूर्वसूचना, चालकांच्या वर्तनाचे विश्लेषण आणि कार्यप्रणालीचे परीक्षण यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील. हे सहकार्य मागील राबविण्यात आलेल्या पायलट प्रकल्पांच्या अनुभवांवर आधारित असून, तंत्रज्ञान-सक्षम महामार्ग परिसंस्था उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
एनएचईव्ही भारतातील महामार्गांना इलेक्ट्रॉनिक हायवे मध्ये विकसित करण्याच्या राष्ट्रीय दृष्टिकोनावर काम करत असून,याचा उद्देश मोठ्या प्रमाणावर कनेक्टेड आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. २०२७ पर्यंत देशातील २६ प्रमुख महामार्ग कॉरिडॉरवर या उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना आहे. चार्जिंग पायाभूत सुविधा, ऊर्जा व्यवस्थापन, डिजिटल प्रणाली,आर्थिक सहाय्य आणि कार्यप्रणाली सहाय्य यांचे एकत्रीकरण करून एनएचईव्ही भारतासाठी व्यावसायिकदृष्ट्या सक्षम अशा लांब पल्ल्याच्या ईव्ही परिसंस्थेची निर्मिती करत आहे.
या आराखड्याअंतर्गत, एनएचईव्ही-सक्षम कॉरिडॉरवर कार्यरत व्यावसायिक ईव्हींसाठी नेत्राडाइनचे एआय प्लॅटफॉर्म चालक वर्तन विश्लेषण, वाहन निरीक्षण आणि कॉरिडॉर-स्तरीय कार्यप्रणाली नियंत्रणाद्वारे महत्त्वपूर्ण सुरक्षा आणि इंटेलिजन्स प्रदान करेल.
एनएचईव्हीचे प्रोग्राम डायरेक्टर अभिजित सिन्हा म्हणाले की, “पुरवठा साखळीतील अडथळे आणि इंधन संकटांचा कोणत्याही अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होऊ शकतो, हे जगाने पाहिले आहे. एनएचईव्ही ई-हायवे हे भारताच्या आर्थिक तयारीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असून ते शांततेच्या काळात, लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत किंवा जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम करणाऱ्या तेल संकटाच्या काळातही जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत खंड पडू देणार नाहीत.”
ते पुढे म्हणाले की, “भारताचा ई-हायवे दृष्टीकोन हा केवळ चार्जिंग पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नाही , तर व्यावसायिक ईव्ही आणि मालवाहतूक क्षेत्र ज्यावर अवलंबून राहू शकतील अशी कनेक्टेड आणि सक्षम मोबिलिटी इकोसिस्टम निर्माण करण्यावरही भर देतो. ही इलेक्ट्रॉनिक प्रणाली चालकांची सुरक्षा वाढविणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, संभाव्य धोके आधीच ओळखणे आणि फ्लीट ऑपरेटरसाठी कार्यप्रणालीची विश्वासार्हता वाढविणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. नेत्राडाइन सारखे भागीदार हे नेटवर्क अधिक विश्वासार्ह आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य बनविण्यास मदत करत आहेत.”
नेत्राडाइनचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ईएमईए आणि एपीएसी व्यवसाय), दुर्गादत्त नेदुंगडी म्हणाले की, “ एनएचईव्हीच्या इलेक्ट्रॉनिक हायवे उपक्रमाचा भाग होणे हे भारतातील एआय-आधारित मोबिलिटी पायाभूत सुविधांच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचे प्रतीक आहे. चालकांची सुरक्षितता, फ्लीटची दृश्यमानता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी रिअल-टाइम इंटेलिजन्स प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. चालकांचा थकवा, असुरक्षित वर्तन आणि वाहनांशी संबंधित समस्या वेळेवर ओळखून आम्ही रस्ते सुरक्षा वाढविण्यास आणि लांब पल्ल्याच्या ईव्ही ऑपरेशन्सना अधिक सुरक्षित व विश्वासार्ह बनविण्यात योगदान देऊ .”
हा उपक्रम ग्रुप ऑफ ट्रान्सपोर्ट एक्स्पर्ट्स (जीटीई) साठी प्रत्यक्ष अंमलबजावणी व पडताळणीवर आधारित व्यापक व धोरणात्मक शिफारसी तयार करण्यासही मदत करेल. तसेच, एक प्रमुख परिवहन प्राधिकरण स्थापन करण्याच्या आणि परिवहन, दूरसंचार व डिजिटल पायाभूत सुविधांच्या एकत्रीकरणासाठी काम करण्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) व्यापक दृष्टिकोनालाही यातून पाठिंबा मिळतो.
या सहकार्यामुळे फ्लीट ऑपरेटर्स आणि वित्तीय संस्थांना सुरक्षित प्रवास,फ्लीटच्या कार्यक्षमतेत सुधारणा, कामकाजातील पारदर्शकता आणि मालमत्तेची विश्वासार्हता यांच्या माध्यमातून लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचा आत्मविश्वास वाढेल. एनएचईव्हीच्या एकात्मिक महामार्ग पायाभूत सुविधा आणि सहाय्यक रचनेला नेत्राडाइनच्या एआय आधारित सुरक्षा इंटेलिजन्सची जोड मिळाल्यामुळे व्यावसायिक ईव्ही ऑपरेशन्सना अधिक विश्वासार्ह, विस्तारक्षम, व्यवहार्य, फायदेशीर आणि शाश्वत बनवण्याचे या इकोसिस्टमचे उद्दिष्ट आहे.
ही अंमलबजावणी भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासातील एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि स्मार्ट इंटेलिजन्स एकत्र येऊन लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक वाहतूक अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण
टप्पा ठरणार आहे.


