पुणे, दि. २० मार्च : संगीत साधना गुरूकुल आश्रम संस्थेतर्फे ‘अनुभूती संगीत सभा’ या एकल तबलावादनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन २३ व २४ मार्च रोजी एरंवडवणे येथील कर्नाटक हायस्कूलमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात शनिवारी सायं ६ वा. व रविवारी सकाळी १० वा. होणार आहे. सर्वांसाठी निःशुल्क आयोजित या कार्यक्रमास प्रथम येणार्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक अनुप जोशी यांनी दिली.
जर तुम्ही संगीतप्रेमी असाल आणि सुर व ताल सोबत संगीताचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे दोन दिवस तुमच्यासाठी खूप खास असू शकतात.या दोन दिवसांत एकल तबलावादानाच्या कार्यक्रमात तबल्यातील बारकावे जाणून घेता येतील. अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी ही संस्था स्थापन केली आहे. आयोजित कार्यक्रमाचे प्रायोजक टेन एक्सचे मनीष गुप्ता व हरीश भाबड आणि नेक्स्टजेन एज्यूकेशनचे संभाजी चवले हे आहेत.
शनिवार २३ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमाची सुरूवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर यांच्या एकल तबला वादनाने होईल. यानंतर प्रसिद्ध तबलावादक ओजस अढिया यांच्या एकल तबला वादनाने पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे. तसेच २४ मार्च रोजी कार्यक्रमाची सुरूवात फारूखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी यांच्या एकल तबला वादनाने होईल. त्यांचे गुरू जगप्रसिद्ध तबलावादक अनिंदो चॅटर्जी यांच्या कडून तबलावादनाचे धडे घेतले आहे. यानंतर प्रसिद्ध युवा कलाकार यशवंत वैष्णव यांच्या तबला वादनाने कार्यक्रमाची सांगता होईल. यशवंत वैष्णव सध्या सुप्रसिद्ध तबलावादक पं. योगेश सम्सी यांच्याकडून तबलावादनाचे धडे गिरवीत आहेत.
दोन चालणार्या या कार्यक्रमात मिलिंद कुलकर्णी व कल्पतरू ठाकरे हे हार्मोनियमवर साथ देतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे करतील.
अनुभूती संगीत सभा २३ व २४ मार्च रोजी पुणेकरांना घेता येणार एकल तबलावादनाचा आस्वादः सर्वांसाठी निःशुल्क
RELATED ARTICLES


