पुणे, दि. १९ : सन 2022-23, 2023-24, 2024-25 व 2025-26 चार वर्ष कालावधीचे युवक कल्याण क्षेत्रात युवा विकासाचे कार्य करणा-या युवांसाठी तसेच संस्थांसाठी जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात येणार येणार असून पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
*जिल्हास्तर पुरस्काराचे स्वरूप* जिल्हा युवा पुरस्कार जिल्हास्तरावर एक युवक,एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येईल. युवक युवतींसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख १० हजार रुपये (प्रति युवक व युवतीसाठी) तसेच संस्थेसाठी पुरस्कार गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम ५० हजार रुपये याप्रमाणे आहे.
*पात्रतेसाठी निकष* वय १ एप्रिल रोजी १३ वर्षे व ३१ मार्च रोजी ३५ वर्षे पर्यंत असावे. जिल्हा पुरस्कारासाठी जिल्हयात सलग ५ वर्षे वास्तव्य असावे. पुरस्कार विभागून दिला जाणार नाही. मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही. कार्याचे सबळ पुरावे आवश्यक, पुरस्कार दिले नंतर दोन वर्ष क्रियाशिल राहणे आवश्यक राहील. संस्था नोंदणीकृत असावी किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. संस्थाचे कार्य स्वयंस्फुर्तीने केलेले असावे.
*पुरस्काराचे मुल्यांकन:* युवा विकासाचे कार्य युवा व संस्थांनी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत पुरस्कार वर्षालगत पुर्व गत तीन वर्षांची खालील बाबींची कामगिरी विचारात घेण्यात येते. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय,महिला, सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण,व्यसनमुक्ती, तसेच युवांच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या महिला सक्षमीकरण इ.बाबतचे कार्य, शेतक-यांच्या आत्महत्या इ. बाबतच्या समस्या, – साहस बाबतचे कार्य याप्रमाणे करण्यात येणार आहे.
जिल्हा युवा पुरस्काराकरिता जिल्हयातील युवक कल्याण क्षेत्रात काम करणा-या युवक, युवती व संस्थानी उमेदवारांनी मुलाखती व कार्याची पीपीटीव्दारे सादरीकरण केलेल्या कामाची सीडी आदी सबळ पुरावे पृष्ठांकन करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
पुरस्कारांकरिता अर्ज 30 जून 2026 अखेर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, स.नं.191, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, मोझे हायस्कूल समोर, येरवडा, पुणे -411006 येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावे. अर्जाचा विहित नमुना तसेच अधिक माहितीसाठी श्री. दादासाहेब देवकाते, क्रीडा अधिकारी 9923902777, श्री. शिवाजी कोळी, राज्य क्रीडा मार्गदर्शक 7020330488, श्रीमती. ज्योती सुयवंशी, क्रीडा अधिकारी 7798302481, श्रीमती. अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 7387880427 वर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा
अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.


