Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवेदना चिकित्सा शास्त्र हे भविष्यातील सुपर स्पेशालिटी :- तज्ञ

वेदना चिकित्सा शास्त्र हे भविष्यातील सुपर स्पेशालिटी :- तज्ञ

 

 

पुणे,20 जून 2026 : भारतामध्ये वेदना चिकित्सा शास्त्र (पेन मेडिसिन) याबद्दल पुरेशी जागरूकता नाही,मात्र ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या, खेळाडूंची वाढती संख्या आणि त्यातून अधूनमधून निर्माण होणाऱ्या दुखापती, दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता वेदना चिकित्सा शास्त्र हे भविष्यातील एक महत्त्वाचे वैद्यकीय सुपर स्पेशालिटी क्षेत्र म्हणून झपाट्याने उदयास येत असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले. ही माहिती इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन (आयएसएसपी) ची शाखा असलेल्या सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन,पुणे (एसएसपीपी) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित वार्तालापमध्ये सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन,पुणेच्या (एसएसपीपी) अध्यक्ष डॉ.प्रज्ञा भालेराव आणि सचिव डॉ.संजोग मेकेवार यांनी दिली.

 

यावेळी बोलताना एसएसपीपीच्या अध्यक्ष डॉ.प्रज्ञा भालेराव म्हणाल्या की, पाठदुखी व मणक्याचे विकार, मज्जातंतूंशी संबंधित वेदना, कर्करोग, संधिवात अशा आजारांमुळे दीर्घकालीन वेदना उद्भवू शकतात. अशा अनेक स्थितींमध्ये वेदना चिकित्सा शास्त्रामध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असते. प्रगत निदान पध्दती, कमीत कमी छेद असणाऱ्या उपचार प्रक्रिया (मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स) ,रिजनरेटिव्ह थेरपीज आणि बहुशाखीय उपचार पद्धतींचा समाविष्ट असलेले वेदना चिकित्सा शास्त्र हे झपाट्याने विकसित होणारे वैद्यकीय क्षेत्र आहे.

 

एसएसपीपीचे सचिव डॉ.संजोग मेकेवार म्हणाले की, उपचार न झालेल्या किंवा अपुऱ्या उपचारांच्या दीर्घकालीन वेदनांचा व्यक्तीच्या जीवनमानावर, कार्यक्षमतेवर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकर निदान आणि योग्य वेळेत उपचार हे चांगले परिणाम देऊ शकतात.त्यासाठी या चिकित्सा शास्त्राबाबत लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.

 

नवीन राष्ट्रीय उपक्रम : फाइंड अ पेन फिजिशियन

 

वेदना चिकित्सेबाबत असलेली दरी भरून काढण्यासाठी इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन (आयएसएसपी) ने नुकतेच फाइंड अ पेन फिजिशियन हा राष्ट्रीय स्तरावरील लोकजागृती उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे वेदना उपचार क्षेत्रातील तज्ञांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे आणि देशभरातील वेदनातज्ञांचे (पेन फिजिशियन) जाळे अधिक मजबूत करणे हा आयएसएसपीचा उद्देश आहे.ज्यामुळे रूग्ण लवकरात लवकर पेन फिजिशियन्स पर्यंत पोहचू शकतात.

 

या उपक्रमाअंतर्गत देशभरातील प्रशिक्षित पेन फिजिशियन्सची ऑनलाइन डिरेक्टरी तयार करण्यात येत असून यामध्ये आत्तापर्यंत देशभरातील सुमारे 1000 पेन फिजिशियन्स आणि पुण्यातील 30 पेन फिजिशियन्सचा समावेश आहे.

 

डॉ.संजोग मेकेवार म्हणाले की, ही डिरेक्टरी रूग्ण आणि वैद्यकीय तज्ञांमधील दरी भरून काढेल आणि दीर्घकालीन वेदनांवर उपचार होऊ शकतो याबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल.

 

इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन (आयएसएसपी) ही संस्था इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ पेन (आयएएसपी) ची भारतीय शाखा असून, देशातील वेदना चिकित्सा या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण आणि संशोधनात सुधारणा करण्यासाठी कटिबध्द असलेल्या पेन फिजिशियन्सचे प्रतिनिधित्व करते.

 

आपल्या सातत्यापूर्ण उपक्रमांचा भाग म्हणून सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन,पुणे (एसएसपीपी) तर्फे नुकतेच पेनस्कोप पुणे 2026 या आपलय्ा पहिल्या वार्षिक परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. अनरेव्हलिंग फॅशिया : द हिडन की इन क्रॉनिक पेन या संकल्पनेवर आधारित या परिषदेत दीर्घकालीन वेदनांमध्ये फॅशियाची भूमिका आणि वेदना व्यवस्थापनातील नव्या उपचार पध्दतींवर चर्चा करण्यात आली.या परिषदेत भारतभरातील 150 हून अधिक पेन फिजिशियन्स सहभागी झाले होते.

 

रुग्ण आणि आरोग्यसेवा प्रदाते आयएसएसपीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन जवळील पेन फिजिशियन शोधू शकतात.

www.issp-pain.org

https://www.issp-pain.org

/find-pain-physician

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments