Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedद योगा इन्स्टिट्यूट, सांताक्रूझ (मुंबई) तर्फे देशव्यापी उपक्रमांसह 12 वा आंतरराष्ट्रीय योग...

द योगा इन्स्टिट्यूट, सांताक्रूझ (मुंबई) तर्फे देशव्यापी उपक्रमांसह 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय, 22 जून 2026

 

 

 

जगातील सर्वात जुने संघटित योग केंद्र आणि गेल्या 107 वर्षांहून अधिक काळ सर्वांगीण आरोग्य शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या मुंबईतील सांताक्रूझ येथील द योगा इन्स्टिट्यूट (TYI) ने 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) भव्य प्रमाणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यावर्षीच्या “निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण वार्धक्यासाठी योग” या संकल्पनेशी सुसंगत राहून संस्थेने जागतिक स्तरावर शासकीय संस्था, संरक्षण आस्थापना, कॉर्पोरेट कार्यालये, शैक्षणिक परिसर, विमानतळे तसेच डिजिटल माध्यमांद्वारे शेकडो कार्यक्रमांचे आयोजन करत लाखो लोकांना यात सहभागी करून घेतले.

 

 

 

मुंबईपासून चेन्नईपर्यंत आणि जयपूरपासून भुवनेश्वरपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांनी विविध वयोगट आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये निरोगी वार्धक्याचा संदेश पोहोचवला. प्रतिबंधात्मक उपचार असलेली आरोग्यसेवा, लवचिकता आणि सजग जीवनशैली यामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

 

 

या कार्यक्रमाच्या वेळी डॉ. हंसाजी योगेंद्र म्हणाल्या, “वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु शारीरिक व मानसिक ऱ्हास होणे ही गोष्ट स्वाभाविक नाही. योगाच्या माध्यमातून आपण शरीराची ताकद, मनाची स्पष्टता, भावनांमधील संतुलन आणि अंतःकरणातील आनंद टिकवून ठेवू शकतो. निरोगी वार्धक्य म्हणजे केवळ आयुष्यात वर्षांची भर घालणे नव्हे; तर प्रत्येक वर्ष अधिक उत्साही, स्वावलंबी आणि उद्देशपूर्ण बनवणे आहे.”

 

 

 

10 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारी, 100,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्रधारक सर्टिफाईड योग शिक्षक घडवणारी आणि योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित झालेली द योगा इन्स्टिट्यूट आजही जगभरात अस्सल आणि विश्वासार्ह योग शिक्षणाचा प्रसार करत असून व्यक्तींना अधिक निरोगी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी सक्षम बनवत आहे.

 

 

 

योग दिनासाठीच्या कार्यक्रमाची प्रमुख ठळक वैशिष्ट्ये

 

3 दिवसीय ऑनलाइन योग महोत्सव (19–21 जून): जगभरातील सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह आयोजित या महोत्सवामध्ये इस्कॉनचे स्वामी गौरांग दास जी, आहारतज्ज्ञ रायन फर्नांडो, सर्वांगीण आरोग्यतज्ज्ञ मिकी मेहता तसेच द योगा इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शिक्षक यांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. ध्यानधारणा, पोषक आहार, तणाव व्यवस्थापन आणि ध्वनी उपचार (साउंड हीलिंग) यांच्या माध्यमातून निरोगी वार्धक्याकडे जाणाऱ्या व्यावहारिक मार्गांचा सहभागींनी अभ्यास केला.

बांद्रा रिक्लेमेशन येथील भव्य योग सत्र: द योगा इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हंसाजी योगेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी भव्य सामुदायिक योग सत्रात सहभाग घेतला. या कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्री श्री. आशिष शेलार तसेच आरोग्यस्वास्थ्य जागरूकता प्रसारक टेरेन्स लुईस उपस्थित होते.

योग बाय द बे (मरीन ड्राइव्ह): द टाइम्स ऑफ इंडिया, शायना एनसी आणि मिकी मेहता यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सूर्योदयाच्या सकाळच्या योग सत्रात हजारो लोक सहभागी झाले. श्रीमती अनुप्रिया पटेल, श्री. जितीन प्रसाद आणि श्री. जयंत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्याविषयी देशाची वाढती बांधिलकी या उपस्थितीतून स्पष्टपणे दिसून आली.

 

 

संस्थात्मक, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट स्तरावरील पोहोच

 

संस्थेने विविध क्षेत्रांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करून आपली पोहोच अधिक व्यापक केली:

 

सार्वजनिक आणि संरक्षण क्षेत्र: मानसिक स्पष्टता आणि शारीरिक आरोग्यस्वास्थ्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मंत्रालय, सीसीआरवायएन, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (T1 आणि T2), सीआयएसएफ, भारतीय सेना आणि भारतीय वायुदल येथे योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.

शैक्षणिक संस्था: मिठीबाई, एनएमआयएमएस, चेतना आणि ठाकूर कॉलेज यांसह बीएमसीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना आत्मविकासासाठी योगाचे महत्त्व समजावून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कॉर्पोरेट आरोग्यस्वास्थ्य उपक्रम: ओएनजीसी, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, माझगाव डॉक आणि टाटा केअर यांच्यासाठी विशेष आरोग्यविषयक योग उपक्रम आयोजित करण्यात आले. तसेच मॅकलिओड्स फार्मास्युटिकल्स यांच्या सहकार्याने देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर योग कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ), माहीम, मुंबई सेंट्रल आणि विले पार्ले येथील टपाल कार्यालयांमध्ये आयोजित सत्रांद्वारे तसेच चंडोक ग्रुप यांच्या सहकार्याने बोरिवली, अंधेरी आणि चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांपर्यंत योग पोहोचविण्याचे कार्य अधिक बळकट करण्यात आले.

गेल्या 107 वर्षांहून अधिक काळ द योगा इन्स्टिट्यूट अस्सल आणि विश्वासार्ह योग शिक्षण आणि सामुदायिक आरोग्यस्वास्थ्य संवर्धनाच्या क्षेत्रात आघाडीवर राहिली आहे. 10 कोटींहून अधिक लोकांच्या जीवनाला स्पर्श करत, 100,000 पेक्षा अधिक प्रमाणपत्रधारक योग शिक्षकांचे प्रशिक्षण, 1,000 हून अधिक पुस्तकांचे प्रकाशन आणि जगभरातील 10 दशलक्षांहून अधिक सदस्यांचा डिजिटल समुदाय निर्माण करून संस्थेने योग सर्व स्तरांतील लोकांसाठी सुलभ करण्यामध्ये परिवर्तनकारी भूमिका बजावली आहे. योग

क्षेत्रातील संस्थेच्या या असामान्य

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments