पिंपरी-चिंचवड, दि. २२जून २०२६: मातंग समाजाचा तरुण स्व. अविनाश खंडागळे यांनी आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी आपले प्राण त्यागले. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.हिंदू मातंग सेना व शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी सर्व मातंग बांधवांना प्रसिद्धी माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे.
दाखले यांनी म्हटले आहे की,”बंधूंनो, अविनाश दादा शहीद झाला. त्याचे रक्त सांडले. पण मी हात जोडून विनंती करतो – असे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नका. आरक्षण हे त्याच्यासाठीच मागत आहोत. तो गेल्यावर आरक्षणाचा काय उपयोग?सर्वोच्च न्यायालयाने 01/08/2024 ला आरक्षण वर्गीकरणाला हिरवा कंदील दिला आहे. आता लढा न्यायालयीन व घटनात्मक मार्गाने लढायचा आहे. मातंग समाज आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही, पण जिवंत राहून लढेल, मरून नाही!
शासनाला दाखले यांनी इशारा दिला असून तातडीने मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या. दुर्लक्ष केले आणि भविष्यात अशी घटना घडली, तर संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. आम्ही स्व. अविनाश दादाच्या मृत्यूसाठी FIR दाखल करत आहोत.बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही! ही आता आपली जबाबदारी!”
मातंग बांधवांना दाखले यांनी खालील आवाहने केली आहेत.:-
1. जीव महत्वाचा: अविनाश दादा गेला, आता दुसरा कोणीही जाऊ द्यायचा नाही. समाजाला हे समजवा.
2. कायदेशीर लढा: SC निकाल आपल्या बाजूने आहे. आयोग, आंदोलन, न्यायालय – या मार्गाने जाऊ.
3. FIR दाखल करा: उपवर्गीकरणाला विरोध करणारे कपिल के सरोदै राजू चाटे व इतर विरोध करणारे तसेच शासन जबाबदार आहे.
दाखले म्हणले की,आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद बाबांनी सांगितले – “शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा”. आत्महत्या नाही, संघर्ष करा! अविनाश दादाच्या स्वप्नासाठी आपण जि
वंत राहू!


