Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedसामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*

सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे*

 

 

पुणे, दि. २३ (जिमाका, वृत्तसेवा): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात “सामाजिक न्याय दिन” साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सकाळी ८.३० वाजता संविधान जनजागृती प्रभातफेरी व समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ही समता दिंडी राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, पर्वती पायथा येथून सुरू होऊन श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती पायथा, पुणे येथे समाप्त होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन नगरविकास मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते होणार असून समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 

राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आयोजित या समता दिंडीत शासकीय-निमशासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक, विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक, युवक मंडळे व बचत गटांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, पुणे श्री. विशाल लोंढे यांनी केले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments