पुणे, दि.२४ : पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे माहे जुलैमध्ये मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी १, २ आणि ३ जुलै २०२६ रोजी खेड, ६, ७ आणि ८ जुलै रोजी मंचर, १३, १४ आणि १५ जुलै रोजी जुन्नर, २०, २१ आणि २२ जुलै रोजी वडगाव मावळ आणि २७ व २८ जुलै २०२६ रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३० जून २०२६ रोजी दुपारी ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.
000


