Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमातंग समाजाचा उपवर्गीकरणाचा पायी मोर्चा यशस्वी; अ-ब उपवर्गीकरण झालंच पाहिजे!" - लोकसेवक...

मातंग समाजाचा उपवर्गीकरणाचा पायी मोर्चा यशस्वी; अ-ब उपवर्गीकरण झालंच पाहिजे!” – लोकसेवक युवराज दाखले

मुंबई/पिंपरी-चिंचवड(प्रतिनिधी) दि. २५ जून २०२६:– मातंग समाजाच्या अ-ब उपवर्गीकरण/आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी निघालेला ऐतिहासिक पायी मोर्चा आज प्रचंड यशस्वी झाला. हजारो मातंग बांधव रस्त्यावर उतरले. जनतेच्या एकजुटीसमोर शासनाला झुकावंच लागेल. असा विश्वास शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी आझाद मैदान येथे व्यक्त केला. अ-ब आरक्षण वर्गीसकरणासाठी निघालेल्या मोर्चाचे आझाद मैदान येथे सभेमध्ये रूपांतर झाल्यावर येथे (दि.२४) सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.मुंबईतील आझाद मैदानाला ‘क्रांतीसूर्य बाबासाहेब गोफले मैदान’ असं नामकरण करावं अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

 

यावेळी दाखले म्हणले की,आज मातंग समाजाने दाखवून दिले की आम्ही संघटित आहोत. अ-ब उपवर्गीकरण झालंच पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाने 01/08/2024 ला परवानगी दिली आहे. आता शासनाने फक्त आयोग स्थापन करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं आहे. विलंब खपवून घेणार नाही.”पायी मोर्चा यशस्वी झाला म्हणजे शासनाला जाग आली पाहिजे. जर 30 दिवसांच्या आत उपवर्गीकरणाचा निर्णय + आयोगाची घोषणा झाली नाही, तर शिवशाही शासन पक्ष मंत्रालयावर महामोर्चा काढेल. मातंग समाज आता जागा झाला आहे.आमचा तरुण अविनाश दादा उपवर्गीकरणासाठी शहीद झाला. त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. जिवंत राहून लढा जिंकू, मरून नाही!

 

 

यावेळी शिवशाही शासन पक्ष संस्थापक प्रमुख तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले, जेष्ठ नेते नामदेव अण्णा रिटे,सकल मातंग समाज पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, शिवशाही शासन पक्ष सचिव सरोज यांना कांबळे प्रदेश उपप्रमुख मंगेश डाखोरे प्रदेशाध्यक्ष कृष्णा दादा साबळे कार्यालयीन सचिव कल्पना मोरे दाखले प्रदेशाध्यक्ष उषाबाई कांबळे शिवशाही तृतीय पंथी भगिनी आघाडी प्रदेश प्रमुख अर्चनाताई शिंदे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आणि ताई वैरागड मांगल्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू आवळे क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश शिंदे शंकर खवळे अविनाश गायकवाड , आकाश घोलप, या पायी मोर्चाला संबोधित विधान परिषदेचे आमदार अमित गोरके, आंदोलक तथा साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे,लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना चे प्रमुख शंकर भाऊ तडाके भास्कर नेटके अशोक लोखंडे दीपक आवारे हर्षद खान, दीपक कसबे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे,गीता ताई आढागळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मोर्चातील दोन प्रमुख मागण्या:

1. अ-ब उपवर्गीकरण तातडीने लागू करा: मातंग समाजाला SC मधील ‘ब’ प्रवर्गात टाकून लोकसंख्येच्या प्रमाणात 7% आरक्षण द्या.

2. आझाद मैदानाचे नामकरण: मुंबईतील आझाद मैदानाला ‘क्रांतीसूर्य बाबासाहेब गोफले मैदान’ असं नामकरण करावं. बाबासाहेब गोफले यांनी मातंग समाजाच्या स्वाभिमानासाठी आयुष्य वेचलं. त्यांचं नाव या मैदानाला दिलं तरच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली

मिळेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments