मुंबई: आयसीआयसीआय बँकेने आयमोबाइल पे या आपल्या रिटेल मोबाइल बँकिग अॅपचा वापर इतर बँकांच्या एक कोटी ग्राहकांतर्फे केला जात असल्याची घोषणा केली आहे. आयसीआयसीआय बँकेने हे अॅप इतर बँकांच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्यापासून केवळ तीन वर्षांत हा लक्षणीय टप्पा बँकेने गाठला आहे.
२००८ मध्ये मोबाइल बँकिंग अॅप लाँच करून आयसीआयसीआय बँक या क्षेत्रातील अग्रणी बँक ठरली व त्यामुळे भारतात डिजिटल बँकिंगला चालना मिळाली. डिसेंबर २०२० मध्ये या अॅपच्या सेवा इतर बँकांच्या ग्राहकांना या सेवा उपलब्ध करून देणारी ती पहिलीच बँक ठरली. तेव्हापासूनच कोणत्याही बँकेचे ग्राहक काही काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने आयमोबाइल पे अॅपचा वापर करू शकत आहेत –
बचत खाते अॅपशी जोडणे, युपीआय आयडी तयार करणे व सोयीस्कर सुविधांचा लाभ घेणे. त्यामध्ये कोणत्याही युपीआय आयडी किंवा व्यापारांना पेमेंट करणे, बिले भरणे, ऑनलाइन रिचार्ज करणे आणि कोणतेही बँक खाते, पेमेंट अॅप किंवा डिजिटल वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करणे यांचा समावेश आहे. त्याशिवाय युजर्सना बचत खाते वापरता येते, गृह कर्ज किंवा क्रेडिट कार्डासाठी अर्ज करणे या आयसीआयसीआय बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या इतर सेवांचा लाभ घेता येतो.
इतर बँकांचे एक कोटी ग्राहक आयमोबाइल पे अॅपचा वापर करत असून फेब्रुवारी २०२४ सह या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत (एप्रिल- फेब्रुवारी) एकूण व्यवहारांचे मूल्य गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत वाढले आहे. या दरम्यान सरासरी व्यवहार मूल्यही १६ टक्क्यांनी वाढले आहे.
या लक्षणीय कामगिरीविषयी आयसीआयसीआय बँकेच्या डिजिटल चॅनेल्स व भागिदारी विभागाचे प्रमुख सिद्धार्थ मिश्रा म्हणाले, ‘आम्ही ग्राहकांसाठी बँकिंग सेवांमध्ये सातत्याने नाविन्य आणि सुलभता आणण्याचा प्रयत्न करत असतो. आमचे रिटेल बँकिंग अॅपची सेवा गेल्या तीन वर्षांत इतर बँकांच्या एक कोटी ग्राहकांतर्फे वापरली जात आहे यावरून सुलभ डिजिटल बँकिंग अनुभव देण्यातील आयमोबाइलची लक्षणीय भूमिका दिसून येते. आयमोबाइल पे च्या मदतीने आम्ही ग्राहकांच्या त्यांचे पैसे हाताळण्याच्या पद्धतीमध्ये तसेच त्यांच्या व्यवहारात क्रांती घडवून आणत आहोत. आम्ही सोपा, सुरळीत, सुरक्षित, सहज वापरता येण्यासारखा बँकिंग प्लॅटफॉर्म आणला आहे, ज्याद्वारे कुठेही आणि कोणत्याही वेळी ४०० सेवांचा लाभ घेता येतो. या अॅपचा मोठ्या प्रमाणावर अवलंब होत असल्याने आम्हाला आनंद झाला असून सातत्याने नाविन्यपूर्ण सेवा देऊन ग्राहकांची सोय करण्यासाठ आम्ही उत्सुक आहोत.’
लाँचपासून आयमोबाइल पे अॅपमध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण सेवांमुळे ते लोकप्रिय झाले होते. या सेवांमध्ये युपीआय व्यवहार, निधी हस्तांतरण, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, मोबाइल रिचार्ज आणि बिल पेमेंट्स यांचा युजर्सद्वारे सर्वाधिक वापर केला जातो. त्याशिवाय मोबाइल फोन क्रमांक/युपीआय आयडी वापरून युपीआय ट्रान्सफर करणे, स्कॅन टु पे, बिल पेमेंट्स, बॅलन्स तपासणे अशा व्यवहारांचा वारंवार वापर होत आहे. प्रत्येक वेळेस त्यांच्या व्यवहारांच्या मूल्यही वाढले आहे. इतर उल्लेखनीय सुविधांमध्ये क्रेडिड कार्ड, कर्जाचे खाते, कर्जाचा सारांश पाहाणे आणि व्हीपीए तयार करणे यांचा समावेश होतो. या सेवांमुळे या अॅपच्या लोकप्रियतेमध्ये भर पडत आहे. रूपे क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, एनपीएस, निश्चित ठेवी, म्युच्युअल फंड्स, ऑटो लोन टॉप- अप आणि क्रेडिट कार्ड अपग्रेड या सेवांना युजर्सकडून चांगली मागणी मिळत आहे.
हा विक्रमी टप्पा आयमोबाइल पे अॅपला सर्वत्र विशेषतः मोठ्या शहरांत मिळत असलेला युजर्सचा प्रतिसाद आणि त्यांच्याकडून होत असलेल्या वापराचे प्रतीक आहे.
आयमोबाइलविषयी अधिक माहिती व हे अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल पे स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरला भेट द्या.
आयमोबाइल पे वापरण्यासाठी कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना त्यांचे बँक खाते या अॅपसह लिंक करता येईल, युपीआय आयडी तयार करून वापर सुरू करता येईल.


