ब्रँडने सलग दुसऱ्या वर्षी सहामाही विक्रीत विक्रमी कामगिरी केली.
H1 2025 च्या तुलनेत 38,894 वाहनांच्या विक्रीसह 7.5 टक्के वाढ.
मुंबई, 1 जुलै 2026 – स्कोडा ऑटो इंडियाने 2025 मधील आपल्या आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी वर्षातील दमदार कामगिरीचा वेग 2026 च्या पहिल्या सहामाहीतही कायम राखला आहे. कंपनीने H1 2026 मध्ये एकूण 38,894 वाहनांची विक्री नोंदवत, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 7.5 टक्के वाढ साध्य केली आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत भारतातील आपल्या 25 वर्षांच्या प्रवासातील त्यावेळची सर्वोच्च सहामाही विक्री नोंदविणाऱ्या ब्रँडने H1 2026 मध्ये त्या विक्रमालाही मागे टाकत आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिक्रिया देताना स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, “सहामाहीतील आमची विक्रमी विक्री ही स्कोडा ब्रँडवर ग्राहकांनी व्यक्त केलेल्या वाढत्या विश्वासाचे आणि आमच्यावरील त्यांच्या दृढ विश्वासाचे प्रतिबिंब आहे.. 2026 मध्ये आम्ही ग्राहक-केंद्रित उपक्रम, उत्पादनांवरील ठाम लक्ष आणि उत्कृष्टतेप्रती आमची अविचल बांधिलकी यांच्या माध्यमातून हे नाते अधिक दृढ केले आहे. नवीन कुशाक, अद्ययावत कोडियाक आणि सर्वस्वी नवीन कोडियाक आरएस या मॉडेल्सना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद—विशेषतः अवघ्या सहा मिनिटांत पूर्णपणे विकली गेलेली कोडियाक आरएस—बाजारातील मजबूत मागणीचे द्योतक आहे. कायलॅक सातत्याने विक्रीला चालना देत आहे, तर स्लाव्हिया आमच्या सेडान परंपरेला अधिक बळकट करत आहे. भारतातील दीर्घकालीन आणि शाश्वत वाढ सुनिश्चित करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने, पारदर्शक संवाद आणि ग्राहकांना आनंददायी मालकीचा अनुभव देण्यावर आमचा भर कायम राहील.”
विस्तारणारे नेटवर्क
स्कोडा ऑटो इंडियाने देशभरातील आपले जाळे विस्तारत 340 हून अधिक टचपॉइंट्स उभारले आहेत, ज्यामुळे हा ब्रँड भारतभरातील ग्राहकांसाठी अधिक सहज उपलब्ध झाला आहे. याशिवाय, ग्राहकांना अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि निश्चिंत सेवा अनुभव देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देण्यासाठी कंपनीने अलीकडेच स्कोडा एक्सप्रेस केअरचीही सुरुवात केली आहे.
कामगिरीच्या बळावर दमदार भरारी
या प्रगतीच्या प्रवासात कंपनीने आपल्या रेसिंग डीएनए आणि मोटरस्पोर्ट्समधील समृद्ध वारशावरही विशेष भर दिला आहे. स्लाव्हिया मॉन्टे कार्लो, कुशाक मॉन्टे कार्लो, कायलॅक, कोडियाक आणि मर्यादित संख्येत उपलब्ध ऑक्टाव्हिया आरएस या स्कोडा ऑटो इंडियाच्या संपूर्ण वाहन ताफ्याने मिळून ‘द फास्टेस्ट मल्टी-कार रिले ऑफ अ सिंगल मॅन्युफॅक्चरर ऑन अ सर्किट’ या विक्रमासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. चालक बदलण्यासाठी लागणारा वेळ धरून या पाचही वाहनांनी कोयंबतूर येथील कोएएसटीटी ट्रॅकवर एकूण 12:30.97 मिनिटांचा लॅप टाइम नोंदवला. या कामगिरीसह ब्रँडने ‘ग्रेटेस्ट ऑन अ ट्रॅक इज अ स्कोडा ऑन अ ट्रॅक’ या मोहिमेलाही सुरुवात केली असून, आपल्या उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याचा आणि दमदार कामगिरीचा प्रत्यय देतानाच सातत्यपूर्ण प्रगतीचाही ठसा उमटवला आहे.
*****


